जखमी जवानाची घरी जाऊन भेट घेऊन केला सत्कार.

उस्मानाबाद, २६ जुलै २०२० : कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी अधिकारी, तसेच राजकीय नेते हे सतत प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. गावोगावी जाऊन तिथे असलेल्या समस्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न सर्वचजण करत आहेत. अशा या काळात भारत – चीन सिमेवर असणाऱ्या चकमकीत जखमी झालेला जवान त्यांच्या घरी आल्यावर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिनांक २५ जुलै रोजी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.

तुळजापूर तालुक्यातील कुंभारी या गावातील रमजान सूरीज पठाण, लडाख येथे भारत – चीन या सीमेवर मागे झालेल्या चकमकीमध्ये जखमी झाला होता. आता तो आपल्या घरी परतल्याचे समजल्यावर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली,त्यांची विचारपूस केली आणि सोबतच त्यांच्या शौर्याचे कौतुक करून त्यांचा सत्कार देखील केला.

शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ.कैलास घाडगे -पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, सतिश कुमार सोमाणी, प्रतिक रोचकरी, आदी ग्रामस्थ देखील या प्रसंगी तेथे उपस्थित होते.

न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा