गोल पोस्ट स्पॉटलाइट सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसोझाला ह्रदय विकाराचा झटका

सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसोझाला ह्रदय विकाराचा झटका

मुंबई, ११ डिसेंबर २०२०: सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसोझाला ह्रदय विकाराचा झटका आला आसून त्यांना आयसीयुत भर्ती करण्यात आले आहे. मुंबईच्या कोकीलाबेन रूग्णालयात रेमोवर उपचार सुरू आहेत. अचानक झालेल्या या घटनेमुळे संपूर्ण चित्रपट सृष्टीला धक्का बसला आहे.

प्रसिद्ध डान्स कोरीयोग्राफर म्हणून रेमो डिसोझाची इंडस्ट्री मधे ओळख आसून अनेक कलाकार आता रूग्णालयात रेमोच्या तब्येतीसाठी येत आहेत. डान्सर धर्मेश हा रूग्णालयात आला आहे.

रेमोची प्रकृती सुधरत आसून पुढील २४ तास काळजीचे असल्याचे बोलले जात आहे. तर रेमोची हि बातमी कळताच देशभरातून त्याच्यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. रेमोने ABCD, ABCD 2, अश्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. तर डान्स प्लस, झलक दिखलाजा या रियलॅटी शो मधे काम केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखील जाधव

error: Content is protected !!
Exit mobile version