गोल पोस्ट स्पॉटलाइट सुप्रसिध्द कोरियोग्राफर सरोज खान यांचे निधन.

सुप्रसिध्द कोरियोग्राफर सरोज खान यांचे निधन.

मुंबई, दि. ३ जुलै २०२०: प्रसिद्ध डान्स कोरियोग्राफर सरोज खान यांचे कार्डियक अरेस्ट मुळे निधन झाले. वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्या अस्वस्थ होत्या तर वांद्रातील स्थित एका रुग्णालयात त्यांनी आखेरचा श्वास घेतला.

सरोज खान यांनी गेली ४ दशकं बाॅलिवूड क्षेत्रात काम करत होत्या तर २००० पेक्षा जास्त गाणीं त्यांनी कोरियोग्राफ करण्याचे श्रेय देखील त्यांचे आहे. या प्रवसात त्यांना ३ वेळा नॅशनल पुरस्कार ने सम्मानित करण्यात आले होते.

देवदास चित्रपाटातील “डोला रे” तेजाब मधील माधुरी दिक्षित च “एक दो तीन” तर २००७ मधील जब वी मेट चित्रपटातील “ये इश्क” या तीन गाण्याच्या कोरियोग्राफीत त्यांना नॅशनल पुरस्कार मिळाले होते.

सरोज खान यांनी शेवटी करण जोहरच्या धर्मा प्राॅड्कशन मध्ये बनलेला चित्रपट “कलंक” या चित्रपटातील “मैं तबाह हो गई” या गाण्याची कोरियोग्राफी केली होती ज्या मध्ये माधुरी दिक्षित दिसली होती.तर हा चित्रपट २०१९ ला प्रदर्शित झाला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version