सुप्रसिद्ध शायर राहत इंदोरी यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

इंदोर, ११ ऑगस्ट २०२०: आज ११ ऑगस्ट मंगळवारी प्रसिद्ध कवी (शायर) राहत इंदौरी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. त्यांना कोरोना विषाणूची लागणही झाली होती, ज्यासाठी मध्य प्रदेशातील इंदूर येथे १० ऑगस्ट रोजी रात्री उशिरा ऑरबिंदो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राहत इंदौरी यांचा मुलगा सतलज यांनी याबाबत माहिती दिली होती, नंतर रहात इंदौरी यांनी स्वत: देखील याबद्दल ट्विट केले

राहत इंदौरी यांनी स्वत: ट्विटरवरुन ही माहिती दिली. त्यांनी लिहिले की, ‘कोविडची सुरुवातीची लक्षणे दिसू लागल्यानंतर काल माझी कोरोना टेस्ट केली गेली होती, जी पॉझिटिव्ह आली आहे. मी ऑरबिंदो हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिटी आहे, मी लवकरात लवकर या आजाराचा पराभव करावा अशी प्रार्थना करा. आणखी एक विनंती आहे, मला किंवा माझ्या घरच्या लोकांना फोन करु नका, माझा आरोग्याविषयी सर्व माहिती फेसबुक व ट्विटर वर तुम्हाला मिळत राहील.’

राहत इंदोरी हे एक सुप्रसिद्ध शायर आहेत. त्यांनी लिहिलेले शेर चाहत्यांच्या नेहमीच चर्चेत असतात. अलीकडच्या काळात सोशल मीडियावर त्यांचे काही शेर भरपूर प्रमाणात वायरल झाले होते. त्यातल्यात्यात ‘बुलाती है मगर जाने का नही’ हा त्यांनी लिहिलेला शेर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. राहत इंदोरी यांनी शायरी तर केलीच त्याचबरोबर त्यांनी बॉलीवुडसाठी गाणी देखील लिहिली आहेत.

राहत यांचा जन्म १ जानेवारी १९५० रोजी इंदूर येथे कापड गिरणीतील कर्मचारी रफ्ताउल्ला कुरेशी आणि मकबूल उन निशा बेगम यांच्या पोटी झाला. त्या दोघांचेही इंदोरी हे चौथे अपत्य होते. त्यांचे प्रारंभिक शिक्षण नूतन स्कूल इंदूर येथे झाले. त्यांनी १९७३ मध्ये इस्लामिया करीमिया कॉलेज इंदौर येथून पदवी पूर्ण केली आणि १९७५ मध्ये भोपाळच्या बरकतुल्ला विद्यापीठातून उर्दू साहित्यात एम.ए केले. त्यानंतर १९८५ मध्ये मध्य प्रदेश भोज मुक्त विद्यापीठ, उर्दू साहित्यात पीएचडी केली.

त्यांची कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती आणि सुरुवातीच्या काळात राहतजी यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. वयाच्या दहा वर्षांपेक्षा कमी वयातच त्यांनी स्वत: च्या शहरात साइन-पेंटर म्हणून काम करण्यास सुरवात केली. पेंटिंग हे त्याच्या आवडीचे क्षेत्र होते आणि त्यांनी लवकरच त्यामध्ये नाव देखील कमावले. ते काही वेळातच इंदूरचे सर्वात व्यस्त साइनबोर्ड चित्रकार बनले. नंतर अशी वेळ आली होती की ग्राहकांना त्यांच्या वेळेसाठी थांबावे लागत असे. त्यांनी रंगवलेल्या साईन बोर्ड आजही इंदोर मधील अनेक दुकानावर पाहण्यास मिळतात.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा