बारामती, ३० जानेवारी २०२१: बारामतीत दुर्मिळ जातीची वेस्टर्न इंडीयन लेपर्ड गेको पाल आढळली असुन या पालीला शास्त्रीय नाव युब्लेफारिस फुस्कस असे शास्त्रीय नाव असुन लहान असताना पालीला अंगावर पिवळ्या आणि तपकिरी रंगाचे आडवे पट्टे असतात.
मोठी झाल्यावर या पालीच्या अंगावर बिबट्या सारखे ठिपके दिसतात म्हणून या पालीला लेपर्ड गेको असे म्हणतात. पाठ व शेपूट भागावर रुंद, फिकट पट्टे असून ठळक डाग असतात, शेपूट फुगीर असुन बोटे निमुळती असतात.
ही पाल रात्री वावरणारी व मध्यम आकाराची पाल माळरानातील खडकाळ जमीन, कोरड्या, गवताळ व वाळवंटी भागात आढळते बारामतीच्या सावळ पक्षी निरीक्षण केंद्राच्या परिसरात प्रथमच ही पाल पाहिली असल्याचे ग्रीनवर्ल्ड फांऊडेशन प्राणी अभ्यासक श्रीमंत मांढरे यांनी सांगितले.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव