दहावीनंतर काय…? या विषयावर कोथरूडमध्ये विद्यार्थ्यांसाठी वेबिनार

14

पुणे, दि. २७ जुलै २०२० : काल कोथरूड कर्वेनगरशाखेच्या वतीने दहावी नंतर काय? या विषयावर वेबिनार आयोजित करण्यात आला ज्याला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला,१३० पेक्षा जास्त विद्यार्थ्यां व पालकांनी नावनोंदणी केली व तेवढ्याच संख्येने उपस्थिती दर्शवली (प्रतीक्षा यादीत पण बरीच नावे राहिली)

एन एम व्ही कॉलेजचे प्राध्यापक , एच एस सी बोर्ड, सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसिजरचे कमिटी सदस्य श्री सचिन हलदूले सर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले, सुमारे ३ तास रंगलेल्या या चर्चासत्रात सध्याची ११वी ची प्रवेश प्रक्रिया, फॉर्म भरताना घेण्यात येणारी काळजी, संकेत स्थळावरील नोंदणीकरण अशा महत्त्वपूर्ण विषयांची अभ्यासपूर्ण माहिती देण्यात आली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोथरूड शाखेचे अध्यक्ष श्री माधव तिळगूळकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली तसेच महिला अध्यक्षा सौ भारती ताई भोपळे, डॉ अरुण व सौ चित्रा जोशी, श्री अनिरुद्ध पळशीकर, सौ नेहा तिळगूळकर, सौ जयश्री घाटे, सौ स्मिता इनामदार, सौ कुंदा बिडकर यांचे मोलाचे योगदान लाभले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्र संचलन सौ केतकी कुलकर्णी (जिल्हाध्यक्षा महिला आघाडी) यांनी केले व डॉ सौ अचला दिक्षित यांनी सुमधूर स्वरात सरस्वती वंदना सादर केली. या कार्यक्रमासाठी जिल्हा कार्याध्यक्ष श्री मंदार रेडे यांचे विशेष सहकार्य लाभले.

न्यूज अनकट प्रतिनिधी