कामाच्या ठिकाणी काय आहेत नियम?

नवी दिल्ली, दि. १८ मे २०२०: कोविड-१९ च्या व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय निर्देशानुसार मार्गदर्शक तत्वे  सार्वजनिक आणि कामाच्या ठिकाणी लागू होतील. या मार्गदर्शकतत्त्वांनुसार विशेषतः प्रतिबंधित असलेल्या उपक्रमांव्यतिरिक्त इतर सर्व उपक्रमांना परवानगी असेल. तथापि, प्रतिबंधित विभागामध्ये, केवळ पूर्वीच्या गोष्टींप्रमाणेच आवश्यक कामांना परवानगी देण्यात येईल. कामाच्या ठिकाणी अतिरिक्त आवश्यकता देखील निर्धारित केल्या आहेत.

• शक्य आहे तोवर वर्क फ्रॉम होम (घरातून काम करणे) पद्धतीचा अवलंब करणे;

•  सर्व कार्यालये आणि आस्थापनांमध्ये कामाच्या वेगवेगळ्या वेळांचा अवलंब केला पाहिजे.

• सर्व प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणी आणि जास्तीत जास्त वापरात येणाऱ्या भागात थर्मल स्कॅनिंग, हात धुण्यासाठी साबण आणि सॅनिटायझर्सची तरतूद असावी;

• सर्व कार्यस्थळे आणि इतर संवेदनशील स्थाने नियमितपणे स्वच्छ करावीत.

• कामाच्या ठिकाणी कामगारांमध्ये योग्य अंतर, दोन पाळ्यांमध्ये योग्य अंतर आणि जेवणाच्या वेळांमध्ये योग्य अंतर ठेवत शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन केले जावे.

▫️दुकाने आणि बाजारपेठां संबंधित नियम

दुकाने आणि बाजारपेठा वेगवेगळ्या वेळांना उघडल्या जातील हे स्थानिक प्राधिकरणाने सुनिश्चित केले पाहिजे जेणेकरुन शारीरिक अंतर सुनिश्चित होईल. सर्व दुकानांमध्ये ग्राहकांमध्ये सहा फूट अंतर (दो गज की दुरी) निश्चित करणे आवश्यक आहे आणि एकाच वेळी ५ पेक्षा जास्त व्यक्तींना दुकानात प्रवेश करण्यास परवानगी देऊ नये.

▫️काय प्रतिबंधित राहील:

देशभरात मर्यादित उपक्रम प्रतिबंधित राहतील. यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे

• स्थानिक वैद्यकीय सेवा, देशांतर्गत हवाई रुग्णवाहिका आणि एमएचएने परवानगी दिलेल्या सुरक्षिततेच्या उद्देशाने किंवा हेतूंसाठीचा हवाई प्रवास वगळता, सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास;

• मेट्रो रेल सेवा

• शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक आणि प्रशिक्षण/कोचिंग संस्था

• बस आगार, रेल्वे स्थानक आणि विमानतळावरील कॅन्टीन वगळता सर्व हॉटेल, उपहारगृहे आणि इतर आतिथ्य निवास

• सिनेमागृह, शॉपिंग मॉल, जिम, मनोरंजन उद्यान इत्यादी मोठ्या प्रमाणात गर्दी होणारी सार्वजनिक ठिकाणे;

• सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि इतर तत्सम मेळावे व इतर मोठ्या परिषदा आणि धार्मिक स्थळांमध्ये लोकांना प्रवेशास मनाई

• तथापि, ऑनलाइन / दूरस्थ शिक्षणास परवानगी आणि प्रोत्साहन दिले जाईल; आणि, खाद्यपदार्थांची घरपोच सेवा देण्यासाठी उपहारगृहे सुरु ठेवण्यास परवानगी आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा