पार्थ पवारांबद्दल मी काय बोलणार..?: संजय राऊत

मुंबई, १४ ऑगस्ट २०२०: सध्या सुशांत सिंह राजपूत प्रकरण चांगलेच गाजले आहे. राजकारण्यांपासून ते सेलिब्रेटिंपर्यंत सर्वत्रच यावरून हेवेदावे सुरू आहेत. सध्या या प्रकरणाची सीबीआय चौकशी विषयी मागणी जोर धरू लागली आहे आणि यावर पार्थ पवार यांनी देखील वक्तव्य केले होते. यावर शरद पवार यांनी त्यांना फटकारले होते. सध्या याच गोष्टीवरून राज्यात व माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे. आता याबाबत संजय राऊत यांनी देखील आपले मत व्यक्त केले आहे. हा त्यांच्या कुटुंबातील मुद्दा आहे आणि आपल्या कुटुंबा अंतर्गत विषय सोडवण्या मध्ये शरद पवार सक्षम असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

याबाबत बोलताना ते म्हणाले की, “शरद पवार कुटुंबातील प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आहेत. यावरुन इतरांच्या जीवाची लगेच घालमेल होण्याचं काही कारण नाही. त्यांनी चिंता करु नये. हा त्यांचा अंतर्गत विषय आहे, त्यांनाच पाहू द्या”.

संजय राऊत म्हणाले, “दुसऱ्या पक्षातील प्रमुख लोकांना सल्ला देण्याचं काम माझं नाही. सामना एक वृत्तपत्र आहे. आजूबाजूला ज्या काही घडामोडी घडत आहेत त्यावर भाष्य करायचं काम मी करत असतो. काल एक प्रकार घडला. तो मीडियाने घडवला, याच्या पलिकडे त्याला महत्त्व नाही.”

शिवसेने बाबत बोलताना ते म्हणाले की, “बाळासाहेब ठाकरे देखील आम्हाला असेच करायचे परंतु पक्ष हा आम्ही कुटुंबाप्रमाणे मानतो. शरद पवार असो किंवा बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या पक्षातील प्रमुख आहेत. पक्ष एक कुटुंबा सारखा असतो. त्यामुळे कुटुंबातील प्रमुखाने फटकारले असता आम्ही ते आशीर्वाद सारखे मानतो. बाळासाहेब ठाकरे देखील आम्हाला जाहीरपणे फटकारायचे. आम्ही त्यातूनच शिकत गेलो. महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण होते. त्यांनी देखील महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना जाहीरपणे मार्गदर्शन केलंय.”

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा