पुणे १० मार्च २०२१; भारतामध्ये विशिष्ट प्रकारची वाहने नंबर प्लेटसाठी समान कलर-टेक्स्ट कोड का पाळतात आणि इतर वाहनांसाठी दुसर्या कलर-टेक्स्ट कोडचे अनुसरण का केले जाते.हे तुम्हाला माहिती आहे का?कोणती वाहने हे कोणती रंगीत नंबर प्लेट धारण करतात,हे ठरविणारे अनेक मापदंड आहेत.आज आपण त्या बद्दल आधिक जाणून घेऊयात…….
लाल रंग….
या रंगाची प्लेट भरताचे राष्ट्रपती आणि विविध राज्याच्या राज्यपालांच्या वाहनांसाठी वापरली जाते.येथे हा उल्लेख करणे महत्त्वाचे आहे की,पंतप्रधानाच्या कारच्या नंबर प्लेटचा रंग पांढरा आसतो.आगदी सामान्य माणसाच्या कारच्या नंबर प्रथेप्रमाणे.
निळा रंग….
परदेशी प्रतिनिधी/राजदूत यांच्या कार्सला निळ्या रंगाच्या नंबर प्लेट दिल्या जातात.यावर पांढर्या शाईने लिहिलेले असते.या प्लेटवर भारताऐवजी ज्या देशातील तो राजकीय प्रतिनिधी आसतो.त्या देशाचा कोड लिहिला जातो.
हिरवा रंग….
इलेक्ट्रीक वाहनांची नंबर प्लेट हिरव्या रंगाची असते.शून्य उत्सर्जन असलेल्या इलेक्ट्रीक वाहनांसाठी ही प्लेट खास उपलब्ध असते.
बाण आसलेली नंबर प्लेट….
लष्करी वाहनांसाठी वेगळ्या क्रमांक प्रणालीचा वापर केला जातो.रजिस्ट्रेशन प्लेटमध्ये पहिल्या किंवा दुसर्या कॅरेक्टरनंतर वरच्या बाजूस दर्शविणारा बाण आहे.जो ब्राॅड ॲरो म्हणून ओळखला जातो.बाणापुढे येणारे अंक हे वर्ष दर्शवतात.ज्या वर्षी ते वाहन विकत घेतलेले असते.सिरीयसली नंबरनंतर समाप्त होणारे लेटर वाहनांचा क्लास दर्शवते.
पिवळा रंग….
जर नंबर पिवळ्या प्लेटवर काळ्या शाईने लिहिले गेले असेल तर अशा वाहनाला कमर्शियल वाहन म्हटले जाते.अशा प्रकारचा रंग तुम्हाला ट्रक किंवा टॅक्सीवर दिसून येईल.या वाहनांमध्ये प्रवासी तुम्हाला दिसतील किंवा त्यामध्ये मालवाहतूक होताना दिसेल.
काळा रंग….
अशी वाहने तुम्हाला चालविण्यासाठी भाड्याने दिली जातात.या वाहनांला काळ्या रंगाची प्लेट असते.त्यावर पिवळ्या रंगात अक्षर किंवा नंबर लिहिलेले आसतात.अलिशान हाॅटेल ट्रान्स्पोर्ट साठी असलेल्या वाहनांनवर तुम्हला आश्या प्रकारची नंबर प्लेट दिसेल.या ड्रायव्हर्सला व्यावसायिक ड्रायव्हिंग परमिट नसल्यास या कार व्यवसायिक वाहन म्हणून चालू शकतात.
लाल रंगातील पांढर्या अंकाची नंबर प्लेट….
जो पर्यंत वाहनाला आरटीओ कडून परमनंट रजिस्ट्रेशन मिळत नाही.तोपर्यंत रेड रजिस्ट्रेशन नंबर प्लेट तात्पुरत्या स्वरूपात दिली जाते.ही एक महिन्यासाठी वैध आसते दरम्यान सर्व भारतीय राज्ये तात्पुरत्या रजिस्टड वाहनांना रस्त्यावर चालवण्यास परवानगी देत नाहीत.
पांढर्या रंगाची नंबर प्लेट….
पांढर्या रंगाची नंबर प्लेट सामन्या वाहनांचे प्रतिक आहे.या वाहनांचा कमर्शियल वापर होऊ शकत नाही.या प्लेटवर काळ्या रंगाने नंबर लिहले जाते.तसेच हे वैयक्तिक वाहन आहे.याचा अंदाज सर्वजण लावू शकतात.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव.