पुणे, 28 एप्रिल 2022: भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) चा IPO 4 मे ते 9 मे दरम्यान उघडणार आहे. या IPO च्या माध्यमातून सरकार आपला 3.5 टक्के हिस्सा विकून 21 हजार कोटी रुपये जमा करणार आहे.
अशाप्रकारे हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO ठरणार आहे. सध्या हा विक्रम पेटीएम आयपीओच्या नावावर आहे जो गेल्या वर्षी आला होता, ज्याची किंमत 18,300 कोटी रुपये होती. याशिवाय इतर मोठ्या IPO मध्ये 2010 मध्ये कोल इंडियाचा 15,500 कोटी रुपयांचा IPO आणि 2008 मध्ये Rs 11,700 कोटींचा रिलायन्स पॉवर IPO यांचा समावेश आहे.
◾ LIC IPO तारखा:
2 मे – Anchor tranche
4-9 मे – Public offering
◾ इश्यू साइज (LIC IPO Issue size):
22.13 कोटी शेअर्स – एकूण शेअर्सच्या 3.5%
◾ आरक्षण (LIC IPO Reservations):
पॉलिसी धारकांसाठी – इश्यूच्या 10% – 2.21 कोटी शेअर्स
कर्मचाऱ्यांसाठी – 0.15 कोटी शेअर्स
पॉलिसीधारक आणि कर्मचाऱ्यांच्या आरक्षणानंतर, 50% समभाग QIB साठी, 35% किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आणि 15% NII साठी शिल्लक राहतील. QIB च्या शेअर्समधील 60% शेअर्स अँकर गुंतवणूकदारांसाठी राखीव असतील.
प्राईज बँड (LIC IPO Price band): 902/- ते 949/-
लॉट साइज (LIC IPO बिड लॉट साइज): 15
रिटेल आणि कर्मचार्यांसाठी LIC IPO सवलत: रु 45/-
पॉलिसी धारकांसाठी LIC IPO सवलत: रु 60/-
LIC IPO ऑनलाइन अर्ज कसा करावा:
1. तुमच्या नेट-बँकिंग खात्यात लॉग इन करा.
2. इन्व्हेस्टमेंट सेक्शन मध्ये जा आणि IPO/e-IPO पर्यायावर क्लिक करा.
3. डिपॉझिटरी आणि बँक अकाउंट डिटेल्स भरा.
4. व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण करा.
5. व्हेरिफिकेशन नंतर, ‘Invest in IPO’ हा ऑप्शन सिलेक्ट करा.
6. लिस्ट मधून LIC IPO निवडा.
7. शेअर्सची संख्या आणि बीडची आईज इनपुट करा.
8. सर्व माहिती पुन्हा तपासा. जर सर्व काही बरोबर असेल तर ‘Apply Now’ वर क्लिक करा.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे