परेश रावल यांना “त्या” ट्विटमधून नेमकं म्हणायचं तरी काय…?

7

मुंबई, दि.१६ मे २०२०: बॉलिवूड अभिनेते परेश रावल नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे आपण पाहतो. अनेकदा सामाजिक विषयांवर उघडपणे बोलताना आपल्याला पाहायला मिळते. अभिनेता अक्षय कुमारला ट्रोल करणाऱ्यांना त्यांनी सोशल मीडियावरून चांगले उत्तर दिले होते.

सध्या लॉकडाऊनमुळे सगळेच थांबले आहे. अशा परिस्थितीत परेश रावल यांनी केलेल्या एका ट्विटमुळे चांगले चर्चेत आले आहेत. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, ‘काही दिवस लोक सेल्फी घेण्यासाठी विचारण्याची हिम्मत करणार नाहीत आणि त्यासाठी त्रासही देणार नाहीत’, असे म्हटले आहे. त्यांचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहे.

त्यांच्या या ट्विटचा नेमका अर्थ काय असावा असा प्रश्न अनेक जणांना पडला आहे. यातून त्यांना पुढचे काही दिवस लोक जवळ येऊन सेल्फी घेण्याची हिम्मत तरी करणार नाहीत असे कदाचित त्यांना असे म्हणायचे असावे..

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा