काय महाग – काय स्वस्त? जाणून घ्या सर्वसामान्यांना दिलासा की खिशावर वाढला बोजा

नवी दिल्ली, 2 फेब्रुवारी 2022: अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी काल चौथा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. पण सर्वसामान्यांच्या खिशावर काय बोजा वाढणार आहे आणि कोणाकडून दिलासा मिळणार आहे, जाणून घेऊयात काय महाग आणि काय स्वस्त…

इथेनॉल नसलेलं पेट्रोल महागणार

अर्थमंत्र्यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाच्या शेवटी घोषणा केली की 1 ऑक्टोबर 2022 पासून देशात इथेनॉल मिक्सशिवाय इंधनावर प्रति लिटर 2 रुपये उत्पादन शुल्क लागू केलं जाईल. यामागं सरकारने इंधनात इथेनॉलच्या मिश्रणाला प्रोत्साहन देण्याचा युक्तिवाद केलाय. अशा स्थितीत 1 ऑक्टोबरपासून देशात मिश्रण नसलेलं पेट्रोल महाग होणार आहे.

फोन चार्जर स्वस्त होतील

अर्थसंकल्पात इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात देशाला स्वावलंबी बनविण्यावर भर देण्यात आलाय. देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी अर्थमंत्र्यांनी मोबाईल फोन चार्जर, मोबाईल फोन कॅमेरा लेन्स, ट्रान्सफॉर्मर इत्यादींवर शुल्क सवलत जाहीर केलीय.

हेडफोन्स, इअरफोन्स महाग होतील

अर्थसंकल्पात सरकारने Wearable आणि Hearableच्या देशांतर्गत उद्योगाला चालना देण्यासाठी कस्टम ड्युटी संरचना तयार करण्याबाबत बोललं आहे. त्यामुळं चीन आणि परदेशातून आयात केलेले हेडफोन, इअरफोन महाग होणार आहेत.

हिरे आणि दागिने स्वस्त होतील

रत्न आणि दागिने उद्योगाला चालना देण्यासाठी सरकारने कापलेल्या आणि पॉलिश केलेल्या हिऱ्यांवरील कस्टम ड्युटी 5% पर्यंत कमी केलीय. फक्त सॉन डायमंड यापुढं कोणतेही कस्टम ड्युटी लावणार नाही.

कृत्रिम दागिने होतील महाग

बजेटमध्ये कमी मूल्य नसलेल्या कृत्रिम दागिन्यांच्या आयातीला परावृत्त करण्यासाठी सरकारने आता त्यावरील आयात शुल्क कमी करून 400 रुपये प्रति किलो केले आहे. अशा परिस्थितीत हे दागिने आगामी काळात महाग होऊ शकतात.

छत्र्या महाग होतील

पावसात भिजण्यापासून संरक्षण करणाऱ्या छत्र्या आतापासून महाग होणार आहेत. सरकारने बजेटमध्ये त्यांच्यावरील कस्टम ड्युटी वाढवून 20% केलीय. त्यामुळं परदेशातून येणाऱ्या छत्र्या महागणार आहेत. यासोबतच छत्री बनवताना वापरल्या जाणाऱ्या पार्ट्सवरील कर सवलत रद्द करण्यात आलीय.

स्टील भंगाराची आयात स्वस्त होईल

लघु आणि मध्यम उद्योगांना दिलासा देत अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात स्टील भंगारावरील कस्टम ड्युटी सवलत एका वर्षासाठी वाढवली आहे. यामुळं एमएसएमई क्षेत्रातील भंगारातून पोलाद उत्पादनं बनवणाऱ्यांना सोपं जाईल.
खरेदी

स्टेनलेस स्टील स्वस्त होईल

अर्थमंत्र्यांनी सांगितलं की, धातूच्या चढ्या किमती पाहता, सरकारने मोठ्या सार्वजनिक हितासाठी स्टेनलेस स्टील, कोटेड स्टील शीट, मिश्र धातुच्या रॉडवरील काही अँटी-डंपिंग कर हटवण्याचा निर्णय घेतलाय.

आयात केलेली प्रगत यंत्रसामग्री स्वस्त राहील

अर्थमंत्र्यांनी सांगितलं की, अशी काही प्रगत यंत्रे आहेत, जी देशात तयार होत नाहीत. त्यांच्या आयातीवर सरकार काही सूट देईल. त्या यंत्रांवर ही सूट कायम राहणार आहे.

मिथेनॉल स्वस्त

सरकारने मिथेनॉलवरील कस्टम ड्युटी कमी केलीय. त्याचबरोबर पेट्रोलियम शुद्ध करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांवरील शुल्कही कमी करण्यात आलं आहे. यामुळं देशांतर्गत स्तरावर या क्षेत्रांमध्ये मूल्यवर्धनाचा फायदा होईल.

हे महागणार

सीमाशुल्क दरात बदल झाल्यामुळं इतर अनेक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. यामध्ये सिंगल किंवा मल्टिपल लाऊडस्पीकर, स्मार्ट मीटर, सोलर सेल, सोलर मॉड्युल, एक्स-रे मशीन इ. देशात त्यांच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकारने पीएलआय योजनेसारख्या योजना आणल्या आहेत, त्यामुळं त्यांच्यावरील सीमाशुल्क वाढविण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा