पुणे, ३ मे २०२१: विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना हे माहितच असंल की, न्यूटनने शक्तीचे तीन नियम दिले. तिसरा नियम म्हणजे क्रिया-प्रतिक्रियांचा नियम. हा नियम म्हणतो की, प्रत्येक क्रियेची समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते. पश्चिम बंगालच्या निवडणुकांचे निकाल पाहता असं दिसतं की न्यूटनचा हा तिसरा नियम ममतांसाठी उपयोगी ठरला.
बंगालमध्ये भाजपनं ध्रुवीकरणाची भूमिका बजावली. हिंदूंच्या मतांची जुळवाजुळव करणं, मागासवर्गीय-दलितांना सोबत घेणं आणि टीएमसीच्या नेत्यांना फोडून भाजपमध्ये सामील करणं ही भाजपची रणनीती होती. तृणमूल कॉंग्रेस कमकुवत होत आहे आणि हिंदू जागृत झाला आहे, अशी एक लाट निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला.
हे करण्यात भाजपा देखील खूप यशस्वी झाला. जर तसं झालं नसतं तर मागील विधानसभा निवडणुकीत तीन जागा जिंकणार्या भाजपाला राज्यातील दुसरा सर्वात मोठा पक्ष आणि मजबूत विरोधक म्हणून उदयास आला नसता.
भाजपची जागा बंगालमध्ये जरी आता विरोधी पक्षाची असली तरी अमित शहा यांनी प्रचारादरम्यान भाजपला मुख्य पक्ष म्हणूनच गृहीत धरलं होतं. प्रचारादरम्यान अमित शहा यांनी नेहमीच २०० चा जादूई आकडा सहज मिळवणं शक्य असल्याचा दावा केला होता. डावे आणि कॉंग्रेसची युती त्यांच्या जुन्या कामगिरीची पुनरावृत्ती करंल आणि हिंदू ध्रुवीकरण होईल तर निवडणुकीच्या रणधुमाळीत चमत्कार शक्य आहेत, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
कोणालाही अशी अपेक्षा नव्हती की कॉंग्रेस आणि डावे इतके वाईट कामगिरी करतील. दहा वर्षांच्या एंटिंकंबेंसी पक्षाने हिंदूंच्या माध्यमातून भाजपाला काही मते दिली असती तर डाव्या-कॉंग्रेसच्या युतीमध्ये काही भाजपाविरोधी मतेही बदलली असती.
लाटे विरोधात लाट
पण हे स्पष्ट दिसत आहे की, भाजपा त्यांच्या राजकीय डावांमध्ये अडकले आहे. बंगालमध्ये न्यूटनचा तिसरा नियम लागू झाला आणि त्याने त्या लाटेविरूद्ध लाट निर्माण केली. ही लाट होती हिंदू ध्रुवीकरणाच्या विरोधात मुस्लिम आणि धर्मनिरपेक्ष म्हणजेच भाजपला पसंत न करणाऱ्या हिंदूंच्या ध्रुवीकरणा बाबत. ही लाट होती, निवडणुका आधीच अति आक्रमक दिसणाऱ्या एका राजकीय पक्षाच्या अस्वस्थते विषयी. ही लाट होती, आपल्या पारंपारिक पक्षांना सोडून इतर अशा पक्षांसोबत उभं राहण्याची जे भाजपला रोखू शकंल.
याचा परिणाम असा झाला की भाजपाला ५०-५५ टक्के हिंदूंची मत मिळविण्यात यश आलं, तर
७५ टक्क्यांहून अधिक मुस्लिम मताधिक्य इतर कोणत्याही पक्षाकडं न जाता टीएमसीकडं गेलं. उर्वरित हिंदू मतं टीएमसीला मिळाली.
निवडणुकांच्या वेळी एमआयएमच्या ओवेसी आणि फुरफुरा शरीफचे अब्बास सिद्दीकी याबद्दलही मुस्लिमांमध्ये संशय निर्माण झाला होता. बिहारमधील भाजपाच्या विजया नंतर बंगालचे मुस्लिम जो अनुमान काढत होते त्यात ओवेसी हेदेखील एक घटक होते. हेच कारण आहे की बंगालमध्ये मोठी मुस्लिम लोकसंख्या असतानाही ओवैसी घटक वाईट रीतीने अयशस्वी झाला.
डाव्या आणि कॉंग्रेसला जे मतदार आतापर्यंत मतदान करत आले होते त्यांना देखील असं वाटत होतं की, सध्या वैचारिक बांधिलकी किंवा पक्षनिष्ठा महत्त्वाची नाही तर भाजपला राज्यात निवडून येण्यापासून रोखणं महत्त्वाचं आहे. एकीकडं टीएमसीचे काही मत भाजपकडं गेली, तर दुसरीकडं डाव्या आणि कॉंग्रेसच्या व्होट बँकचा मोठा भाग ममताकडं झुकला.
बंगालमधील शेवटच्या दोन टप्प्यात चार जिल्ह्यातील ४९ जागांवर मुस्लिमांची मतं निर्णायक ठरली. यापैकी २६ जागा कॉंग्रेसकडं तर ११ जागा डाव्या बाजूच्या होत्या. टीएमसीकडं येथे केवळ १० जागा होत्या. परंतु यावेळी सर्व जागा टीएमसीकडं आल्या आहेत. ममतांसाठी ३७ जागांचा हा फरक खूप महत्वाचा ठरला आहे.
बंगालमध्ये निवडणुकीपूर्वी गांधी परिवारातून कोणीही प्रचार करण्यासाठी आलं नव्हतं. निवडणुकीच्या मध्यात राहुल गांधी प्रचारासाठी बंगालमध्ये दाखल झाले होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रचार सभा न घेण्याचं घोषीत केलं. बाहेरून राहुल मोठा नैतिक संदेश देताना दिसले, पण यात पक्षाच्या समर्थकांनाही एक मूलभूत संदेश मिळाला.
बऱ्याच दिवसानंतरच राज्यात अनुसूचित जाती व मुस्लिम भाजपाविरोधात एकत्रित झाल्याचं दिसून आलं. दिलीप घोष यांचा अहंकार, भाजपची आक्रमकता आणि ममतांचा बंगाली अस्मितेचा डाव तसंच एकट्या संपूर्ण सैन्यात लढा देण्याचं धैर्य आणि सहानुभूती अशा कित्येक घटकांनी निवडणूकीत भाजपा किंवा मोदींच्या लाटेच्या विरोधात एक वेगळी लाट तयार केली.
याचे परिणाम समोर आहेत. ऐतिहासिक यशानंतरही भाजप विरोधी पक्षांपुरता मर्यादित झालाय. त्याची सर्वात मोठी किंमत डावे पक्ष आणि कॉंग्रेसनं चुकविली आहे, यामुळंच त्यांचं राज्यात कोठेही अस्तित्व दिसून आलं नाही. ममता दहा वर्षांच्या सत्ते नंतर पुन्हा पश्चिम बंगालची सत्ता गाजवणार आहेत. पायातील प्लास्टर कापला गेला आहे… आता ममतांनी आपला पाय पुढं सरकवला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे