पुणे, २५ डिसेंबर २०२०: कोरोनाचे सावट असताना आज जगभरात नाताळ सण म्हणजेच ख्रिसमस साजरा होत आहे. आज आपण याच ख्रिसमस सणाविषयी तथ्य वाचणार असून अजून बरंच काही पाहणार आहोत. ख्रिसमस सण हा जगातील सर्वात मोठ्या लोकप्रिय फेस्टिवल पैकी एक आहे.हा सण २५ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. येशू ख्रिस्त यांच्या जयंती निमित्त हा सण साजरा केला जातो.
ख्रिसमस कसा साजरा होतो…
अनेक लोक त्यांच्या घराबाहेर आकाश कंदील घराची साफसफाई, घरी सुंदर असे डेकोरेशन करतात. कुटंबातील सदस्य मित्र एकमेकांना भेटवस्तू अर्थात गिफ्ट देतात.प्रभूची प्रार्थना करतात. चर्चमधे जातात गोड केकची कटीग करून अनेकांना दिले जाते.तसेच ज्यांना घर नाही, ज्यांच्या जवळ कमी पैसे आहेत आशा लोकांना काही संस्था आणि लोक एकत्र येऊन जेवणाची व राहण्याची सोय करतात आणि सण साजरा करतात.
ख्रिसमस फक्त २५ डिसेंबरलाच साजरा होतो? जगात कोणता देश आधी ख्रिसमसचे स्वागत करतो?
संपूर्ण जगात ख्रिसमस हा सण २५ डिसेंबरला साजरा होत नाही. रशिया, युक्रेन आणि रोमनिया यासरख्या देशातील रूढीवादी ख्रिस्ती धर्मीय लोक ७ जानेवारीला ख्रिसमस साजरा करतात. तर ग्रीनविच वेधशाळेनुसार जगात न्यूझीलंड मधे २५ डिसेंबर रोजी पहिल्यांदा सूर्योदय होतो. त्यामुळे या देशातील लोक सकाळ होताच सर्वात आधी ख्रिसमसचे स्वागत करतात.
किती देशांमध्ये ख्रिसमस साजरा होतो?
संपूर्ण जगभरात जवळपास दर वर्षी १६० देशांमध्ये ख्रिसमस साजरा केला जातो. जगातील तीन लोकांपैकी एकजण या फेस्टिवल मधे सामील होतो. ख्रिसमस नावाचे जगात तसे दोन बेट देखील आहेत. एक प्रशांत महासागरात आहे तर एक हिंद महासागरात आहे.
काही देशांमधे ख्रिसमस वर बंदी….
जगभरात ख्रिसमस सण हा दरवर्षी २५ डिसेंबरला मोठ्या धुमधडाक्याने साजरा होतो. पण तुम्हाला माहीत आहे का की, जगातील ४३ गैर ख्रिश्चन देशांमधे २५ डिसेंबर हा दिवस खास नसतो. ४३ पैकी १८ देशात ख्रिसमसवर पुर्णपणे बंदी आहे. यात चीन बरोबर मुस्लिम देशांचा आणि बौद्ध धर्मीयांचा समावेश आहे. अनेक देशात ख्रिसमस साजरा केल्यामुळे गुन्हा देखील दाखल होतो आणि कठोर शिक्षा होते.
हे आहेत ते मुस्लिम देश…..
अफगाणिस्तान, आल्जेरिया, ब्रुनेई येथे ख्रिसमस साजरा केल्यास ५ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा व दंड होतो. तर कोरोमस, सौदी अरेबिया, सोमलिया, लिबिया, येमेन येथे ख्रिसमसवर बंदी आहे. पाकिस्तान मधे ख्रिसमसवर कायदेशीर बंदी नाही मात्र अल्पसंख्येत असलेल्या ख्रिश्चन लोकांना धोका आहे.
या देशांत धर्मांतरांचे कारण म्हणून ख्रिसमसवर बंदी…..
आशियातील जापान, बहारीन, कजाकिस्तान, लाओस, कुवेत, नेपाळ, ओमान, थायलंड, मालदिव, व्हिएतनाम तर आफ्रिकन देश काँगो, मोरोक्को, इजिप्त, सेनेगल, सुदान मध्य पुर्वेतील इराण, इस्त्रायल, कतार, तुर्कमेनिस्तान या देशांमध्ये ख्रिसमस साजरा झाल्यास आपल्या देशात ख्रिश्चनांनकडून लोकांना पैसा,मदत देऊन मोठ्या प्रमाणात धर्मांतर होऊ शकते.म्हणून या देशांत ख्रिसमसवर बंदी आहे.
जगातील सर्वात मोठा फ्लोटिंग ख्रिसमस ट्री हा ब्राझीलच्या रिओ दी जनेरियो येथे आहे. ज्याची उंची २७८ फूट आसून तो जगातील सर्वात मोठा ख्रिसमस ट्री आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव