‘ये रिश्ता क्या कहलाता है’ अभिनेत्री दिव्या भटनागरचं कोरोनानं निधन…

मुंबई, ७ डिसेंबर २०२०: २०२० हे साल सिनेसृष्टीतील कलाकारांसाठी एक दुखत साल राहिलं आहे. पडद्यावरचे अनेक दिग्गज कलावंत या वर्षात गमावले आहेत. छोट्या पडद्यावरील कलाकारांबाबत देखील दुःखद घटना समोर येत राहिल्या होत्या. नुकतंच छोट्या पडद्यावरील कलाकार रवी पटवर्धन यांचं निधन झालं होतं. टीव्ही विश्वातून आणखीन एक दु:खद बातमी समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर असणारी अभिनेत्री दिव्या भटनागर हिचं आज सकाळी निधन झालंय.

गेल्या अनेक दिवसांपासून ती रुग्णालयात उपचार घेत होती. कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर दिव्याला श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. त्यामुळं तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिच्यावर मुंबईतील गोरेगाव येथील एसआरव्ही रुग्ण्लयात उपचार सुरु होते. गेल्या काही दिवसांपासून डॉक्टर तिच्या प्रकृतीवर सतत नजर ठेऊन होते. मात्र अखेर आज तिची प्राणज्योत मालवली.

दिव्याच्या मृत्यूची माहिती तिचा जिवलग मित्र युवराज रघुवंशी यांनी दिली. युवराजने सांगितलं की, आज सकाळी ३ वाजता दिव्याचा मृत्यू झाला. रात्री दोनच्या सुमारास तिची प्रकृती अचानक खालावली. ३ वाजता डॉक्टर जेव्हा तिला तपासण्यासाठी आले तेव्हा तिचं निधन झालं असल्याची माहिती त्यांनी दिली. दिव्याला २६ नोव्हेंबरला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिचा कोरोना अहवाल २८ नोव्हेंबरला पॉझिटिव्ह आला होता. तिला आधीपासूनच न्यूमोनियाची देखील लागण झाली होती. त्यामुळे तिची प्रकृती अधिकच बिघडत गेली. ज्यामुळे तिचं निधन झालं.

दिव्या चा नवरा फरार

दिव्याच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, दिव्याचा नवरा गगन याचा कुठेही पत्ता लागत नाहीये. गगनने माझ्या मुलीची फसवणूक केली आणि तो फरार झाला असं तिने एका अहवालात म्हटलं आहे. त्यानं तिला प्रेमात फसवलं आणि सोडून दिलं असा धक्कादायक खुलासा तिच्या आईने केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा