काय आहे टीआरपी…? कशी निश्चित होते टीव्हीची विव्हरशिप…?

पुणे, ९ ऑक्टोंबर २०२०: गुरुवारी संध्याकाळी टीव्ही वाहिन्यांच्या टीआरपीसंदर्भात मुंबई पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी स्पष्ट केलं की रिपब्लिक टीव्ही पैसे देऊन आपली टीआरपी वाढवत आहे. या बदल्यात लोकांना देखील पैसे दिले गेले. या बनावट टीआरपी घोटाळ्यानंतर कारवाईची तयारी सुरू आहे. परंतु ही टीआरपी कशी मोजली जाते आणि विव्हरशिप कशी समजली जाते या विषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया.

टीव्ही हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक मोठा भाग आहे. देशभरातील लोक दररोज टीव्ही पाहतात. हे तर सर्वांनाच माहित आहे की, टीव्हीमध्ये शेकडो टीव्ही चॅनल असतात ज्यामध्ये प्रत्येक टीव्ही चॅनल चे आपले टीव्ही शो दाखवले जातात. हे सर्व पाहत असताना आपण टीआरपी विषय देखील ऐकत असतो. परंतु आपणास माहित आहे का ही टीआरपी काय आहे आणि ती कशी मोजली जाते?

टीव्ही चॅनेलची टीआरपी

टीआरपी टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट (Television Rating Point) एक साधन आहे ज्याद्वारे हे समजण्यास मदत होते की, कोणता टीव्ही चॅनल किंवा कोणता कार्यक्रम सर्वाधिक पाहिला जातो. तसंच यामुळं हे देखील समजतं की कोणता चॅनल सर्वात जास्त लोकप्रिय आहे किंवा कोणत्या चैनलवरील कोणता कार्यक्रम सर्वात जास्त पाहिला जातो आणि किती वेळ पाहिली जातो. कार्यक्रमाची सर्वाधिक टीआरपी म्हणजे बहुतेक दर्शक तो प्रोग्राम पहात असतात.

टीआरपी जाहिरातदार आणि गुंतवणूकदारांसाठी खूप उपयुक्त साधन आहे. कारण, यामुळं त्यांना लोकांची आवड व त्यांचा मूड समजण्यास मदत होते. केवळ चॅनेल किंवा प्रोग्रामच्या टीआरपीद्वारेच जाहिरातदारांना हे समजतं की त्यांची जाहिरात कोणत्या चैनल वर व कोणत्या कार्यक्रमादरम्यान सर्वात जास्त दाखवली गेली पाहिजे आणि गुंतवणूकदारांना देखील आपला पैसा योग्य ठिकाणी लावला जात आहे का याचीदेखील पडताळणी करता येते.

टीआरपी कशी मोजली जाते?

टीआरपी मोजण्यासाठी काही ठिकाणी पीपल्स मीटर स्थापित केले आहे. याद्वारे एखाद्या विशिष्ट भागातील काही हजार दर्शकांची नमुना आणि चाचणीसाठी पडताळणी व विचारपूस केली जाते आणि यांच्यातून मिळालेले माहिती सर्व दर्शकांची सरासरी मानत वेगवेगळ्या चॅनेल साठी टीआरपी निश्चित केली जाते. यानंतर पीपल मीटर स्पेसिफिक फ्रीक्वेंसीद्वारे कोणता कार्यक्रम किंवा चॅनेल सर्वाधिक काळ पाहिला जात आहे हे शोधून काढते.

या मीटरच्या माध्यमातून टीव्हीची प्रत्येक मिनिटांची माहिती मॉनिटरिंग टीम इंटम (Monitoring Team INTAM) अर्थात भारतीय दूरदर्शन प्रेक्षक मोजमाप +Indian Television Audience Measurement) कडं दिली जाते. पीपल मीटरकडून प्राप्त माहितीचं विश्लेषण केल्यानंतर ही टीम कोणत्या चॅनेल किंवा कार्यक्रमाला टीआरपी आहे हे ठरवते. हे मोजण्यासाठी, दर्शकांकडून नियमितपणे पाहिलेला कार्यक्रम आणि वेळ निरंतर रेकॉर्ड केला जातो आणि नंतर प्रोग्रामची सरासरी रेकॉर्ड हा डेटा ३० वेळा गुणाकार करून काढला जातो. हे पीपल मीटर कोणत्याही चॅनेल आणि त्याच्या कार्यक्रमाबद्दल संपूर्ण माहिती काढतं.

टीआरपी वाढते किंवा कमी होते तेव्हा काय होते?

कोणत्याही कार्यक्रमाचे टीआरपी कमी झाल्यात याचा परिणाम त्याच्या चैनल च्या नावावर होतो ज्या चैनलवर हा कार्यक्रम दाखवला जात आहे. आपणास माहित आहे की सर्व टिव्ही चैनल जसे की सोनी, स्टार प्लस, झी चॅनेल आणि इतर सर्व चॅनेल जाहिरातींद्वारे पैसे कमवतात? एखाद्या प्रोग्राम किंवा चॅनेलची टीआरपी कमी असल्यास याचा अर्थ असा आहे की लोक ते कमी पहात आहेत. या प्रकरणात, त्याला कमी जाहिराती आणि कमी पैसे मिळतील. परंतु कोणत्याही चॅनेल किंवा प्रोग्रामची टीआरपी जास्त असल्यास त्यास जाहिराती आणि जाहिरातदारांकडून अधिक पैसे मिळतील.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा