गणपतीच्या तयार मुर्त्यांचे करायचे काय? कुंभार समाजाचा सवाल

10

बारामती, दि. १ जुलै २०२०: कोरोना संसर्गामुळे श्रींच्या गणेश मूर्तीची उंची चार फुटांपेक्षा जास्त नसावी असे राज्यसरकारने जाहीर केल्यावर मात्र मूर्ती बनवण्याचे काम हे वर्ष भर सुरू असते गणेश मंडळे मोठ्या मूर्ती मागतात त्याप्रमाणे आमच्याकडे गणेश मुर्ती तयार आहेत या मूर्तीचे काय करायचे असा सवाल कुंभार समाजाकडून होतो आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या निर्णयाप्रमाणे गणपतीची मूर्ती चार फुटांपेक्षा मोठी मूर्ती नसावी असा आदेश काढला आहे. मात्र बारामती तालुक्यातील कुंभार समाजाचे मूर्ती बनवण्याचे काम वर्ष भर सुरू असते सध्या गणेशाच्या वेगवेगळ्या मूर्ती तयार असून त्यावर आता फक्त रंगकाम करणे बाकी आहे.

साधारण ५०० रुपयांपासून पुढे या मूर्तीची किंमत असुन या मूर्ती तयार करण्यासाठी अनेक कारागिरांनी बचत गट,फायनान्स, खाजगी सावकारांकडून पैसे घेतले आहेत.कुंभार समाजाचा उदरनिर्वाह हा या मातीची भांडी,मूर्ती, बनवण्यापासून होतो मात्र राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आम्हाला आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. असे अखिल भारतीय कुंभार महासंघ व मातीकला महासंघाचे अध्यक्ष दत्ता कुंभार यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा