पुण्यात लॉक डाऊन दरम्यान काय असेल चालू व काय बंद?

5

पुणे, दि. १३ जुलै २०२०: शुक्रवारी पुण्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये दहा दिवसांसाठी एक खडक लॉक डाऊन जाहीर केले होते. पुण्यातील कोरोनाव्हायरस संसर्गित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. विशेष म्हणजे अनलॉक प्रक्रिया सुरू केल्यापासून या संख्येमध्ये अचानक वाढ झालेलीे दिसत आहे. यादरम्यान पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनादेखील या विषाणूची लागण झाली होती. पिंपरी-चिंचवडमध्ये देखील एक नगरसेवक या विषाणूंच्या संसर्गामुळे मृत्युमुखी पडले होता.

एकंदरीतच पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही भागांतील रुग्णांची वाढती संख्या पाहता अजित पवार यांनी दहा दिवसांसाठी लॉकडाऊन घोषित केले. या लॉकडाऊन मधील पहिले पाच दिवस हे अतिशय कडक निर्बंधांमध्ये असणार आहेत व पुढील पाच दिवस हे थोडीफार शिथिलता देऊन असणार आहे. आज म्हणजेच १३ जुलै रात्रीपासून हे नवीन लॉक डाऊन सुरू होणार आहे. तर जाणून घेऊया या लॉक डाऊन मध्ये पुण्यामध्ये काय सुरू असेल व काय बंद असेल.

• सर्व किराणा दुकान, सर्व किरकोळ व ठोक विक्रेते, सर्व इतर व्यावसाय करणारी व्यापारी दुकानं १४ जुलै ते १८ जुलैपर्यंत बंद राहतील.

• त्यानंतर १९ जुले ते २३ जुलै या कालावधीत सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत केवळ अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा करणारी दुकाने व त्यांचे ठोक विक्रेते यांची दुकाने सुरु राहतील. मात्र इतर सर्व दुकाने व अस्थापना बंद राहतील.

• विविध कंपन्यांकडून ऑनलाईन पोर्टलवरून मागविले जाणारे खाद्यपदार्थ पुरवठा सेवा १४ जुलै पहाटे १ वाजेपासून ते २३ जुलै रात्री १२ वाजेपर्यंत बंद राहतील.

• सार्वजनिक / खाजगी क्रिडांगणे /मोकळ्या जागा, उद्याने, बगीचे हे संपूर्णत: बंद राहतील. तसेच सार्वजनिक ठिकाणी सकाळी व सायंकाळी फिरण्यासही प्रतिबंधीत राहील.

• उपहारगृह, बार, लॉज, हॉटेल्स, रिसॉर्ट, मॉल, बाजार, मार्केट संपूर्ण बंद राहतील.

• सलून/स्पा/ ब्युटी पार्लर दुकाने संपूर्णत: बंद राहतील.

• मटन, चिकन, अंडी, मासे इत्यादीची विक्री १४ जुलै ते १८ जुलैपर्यंत बंद राहील. त्यानंतर दिनांक १९ जुलै ते २३ जुलै या कालावधीत सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत चालू राहतील.

• १९ जुलै ते २३ जुलै या कालावधीत केवळ सर्व अत्यावश्यक किरकोळ व ठोक विक्रीचे ठिकाणे मोंढा / आडत भाजी मार्केट / फळे विक्रेते, दैनिक भाजी बाजार या कालावधीत सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुरु राहतील.

• अत्यावश्यक सेवेतील वाहने, पूर्व परवानगी प्राप्त वाहने तसेच विमानतळ, रेल्वे स्टेशन येथे जाणे-येणे व वैद्यकीय कारणास्तव प्रवासासाठी खाजगी वाहनाचा वापर सुरु राहील.

• शहरातील सार्वजनिक व खाजगी बस सेवा, ट्रक, टेम्पो, ट्रेलर, ट्रॅक्टर इत्यादी बंद राहतील.

• सर्व प्रकारचे बांधकाम /कंस्ट्रक्शनची कामे बंद राहतील तथापी ज्या बांधकामाच्या जागेवर कामगारांची निवास व्यवस्था असेल त्यांना काम सुरू ठेवता येईल.

• सर्व चित्रपटगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणूक उद्योग, नाटयगृह, बार, प्रेक्षागृह, सभागृह बंद राहतील.

• सर्व प्रकारचे मंगल कार्यालय, हॉल तसेच लग्न समारंभ, स्वागत समारंभ बंद राहतील. मात्र यापूर्वी परवानगी घेतलेले लग्न समारंभ २० पेक्षा कमी व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये आयोजित करता येतील.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा