शिवसेनेचं कसं होणार ?

मुंबई १२ जुलै २०२२ : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच उरलेल्या सच्च्या शिवसेना नेत्यांची बैठक बोलावली होती, पण या बैठकीचं गणित जमलं नाही, असंच म्हणायची आता वेळ आली आहे. केवळ ७ जणांनी हजेरी लावली. मात्र त्यातही संजय राऊत यांच्याबद्दलचा नाराजीचा सूर कायम होते. त्यात काही खासदार अमित शाह यांच्या भेटीला गेले होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. आता आदित्य ठाकरे यांच्या निर्धार यात्रेमध्ये दोन विविध वक्तव्य ऐकायला मिळाली. त्यात त्यांनी तुम्ही परत या, आम्ही मोठ्या मनाने क्षमा करु, अन्यथा निवडणूका लढा, असे वक्तव्य केलं . पण यात कुठेच ठोसपणा पहायला मिळाला नाही.
काही जणांना भाजप आणि शिवसेना आणि शिंदे गट यांची युती व्हावी. असे मत व्यक्त होत असताना, शिवसेना भाजपच्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार असल्याचे शिवसेनेने जाहीर केलं. यानंतर द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा म्हणजे भाजपला पाठिंबा नव्हे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. पण अनंत गीते यांनी गेलेल्या नेत्यांना मातीत गाडा आणि नवीन शिवसेना उभी करा, असं वक्तव्य केलं.

आता या सर्वात शिवसेना नक्की कुणाची ? शिवसेनेकडे धनुष्यबाण हे चिन्ह राहणार का ? पुन्हा शिंदे गट आणि शिवसेना एकत्र येणार का ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आता काळच देईल , हे खरं …

न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा