नवी दिल्ली ३ मे २०२३: व्हॉट्सअॅपने वापरकर्त्यांच्या तक्रारी आणि नियमांच्या आधारे लाखो भारतीय वापरकर्त्यांच्या खात्यांवर बंदी घातली आहे. ज्या ज्या अकाऊंटने भारतीय कायद्याचे किंवा व्हॉट्सअॅपच्या नियमांचे उल्लंघन केले त्या खात्यांवर बंदी घालण्यात आली आहे.
जर एखाद्या युझरने त्याच्या व्हॉट्सअॅपवर बेकायदेशीर, अश्लील, बदनामीकारक, धमकी देणारा, धमकावणारा किंवा त्रास देणारा, द्वेष पसरवणारा किंवा भडकावणारा मजकूर शेअर केला. तर त्याच्या खात्यावर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय, जर एखाद्या वापरकर्त्याने कंपनीच्या नियम आणि अटींचे उल्लंघन केले तर त्याचे खाते देखील बॅन केले जाऊ शकते.
व्हॉट्सअॅपवर हजारो तक्रारी येत आहेत. अनेक अकाउंट वर बंदीचे आवाहन करण्यात येते. व्हॉट्सअॅप त्या सगळ्या तक्रारीची शहानिशा करून त्या त्या महिन्याच्या अखेरीस दोषी खात्यांवर बंदीची कारवाई करते. महिन्याकाठी केलेल्या कारवाईची संख्या ही लाखोंच्या घरात असते.
न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.