नवी दिल्ली, १९ ऑगस्ट २०२०: कोरोनाव्हायरस मुळे जगात सर्वत्र लॉक डाऊन करण्यात आलं आहे. यामुळे सर्व कामकाज देखील घरूनच करण्याची सुरुवात झालीय. सर्व बैठका घरबसल्या व्हिडीओ कॉन्फरन्स वर होण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी अनेक अॅप देखील उपलब्ध आहेत. पण, व्हाट्सअॅप हे असे माध्यम आहे जे जगात सर्वत्रच लोकप्रिय आहे. याआधी व्हाट्सअप वर व्हिडिओ कॉल केला जात होता. मात्र, अनेक लोकांशी जोडण्यासाठी पर्याय उपलब्ध नव्हता, हाच पर्याय आता व्हाट्सअॅप उपलब्ध करून देणार आहे.
आता व्हाट्सअॅप एक नवीन फिचर आणणार आहे, ज्यामध्ये एकाच वेळी पन्नास लोकांना व्हिडीओ कॉल करता येणार आहे. पुढील काही दिवसात व्हॉट्सअॅपकडून हे फिचर लाँच केले जाणार आहे. याशिवाय व्हॉट्सअॅपकडून आणखी काही नवीन फिचर लाँच केले जाणार आहेत. सध्या व्हॉट्सअॅप यावर काम करत आहे. नुकतेच व्हॉट्सअॅपने आपल्या युझर्ससाठी डार्क मोड, डिलिट मेसेज फिचर लाँच केले होते.
फेसबुकने कोरोना काळात व्हिडीओ कॉलिंगचा वाढता वापर लक्षात घेऊन मेसेंजरवर रुम फिचर लाँच केले होते. तसेच कंपनी आता लवकरच व्हॉट्सअॅप युझर्ससाठीही रुम फिचर घेवून येणार आहे. रुम फिचरच्या माध्यमातून एकावेळेस जवळपास ५० व्हॉट्सअॅप आणि व्हॉट्सअॅप वेब युझर्स व्हिडीओ कॉल करु शकणार आहेत. त्यामुळे युझर्सला याचा खूप फायदा होईल, असं कंपनीने म्हटले.
न्यूज अनकट प्रतिनिधी