बारामती, दि. २२ जून २०२०: आज हडपसर वरून बारामती कडे येण्यासाठी सकाळी १० वाजता एसटी बस बारामतीकडे धावायला सुरुवात झाली. सध्या कोरोना संसर्गामुळे सर्वत्र सोशल डिस्टन्स पळाला जातो आहे. तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी अनेक गर्दीच्या ठिकाणांसह वाहतूक देखील बंद ठेवली आहे. जिल्हा बदलून प्रवास करायचा असेल तर त्या व्यक्तीला ऑनलाईन परवानगी घ्यावी लागते आहे.
हडपसर बारामती एसटी ने दिवे घाट संपवून सासवड शहर सोडल्यावर एसटीच्या वाहकाला शेजारच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीच्या हातावर कोरोंटाईनचा शिक्का दिसल्यावर वाहकाचे तर धाबेच दणाणले त्याने त्या व्यक्तीला कोरोंटाईन शिक्याबद्दल विचारल्यावर त्या व्यक्तीने काही सांगितले नाही. वाहकाने परत विचारले तुम्ही घरीच कोरोंटाईन होणार आहे का तर त्यांनी काही सांगितले नाही. आता मात्र वाहकाला काही सुचेना त्याने आपल्या बारामती एसटी डेपोतील अधिकाऱ्याला याबाबत सांगितले असता वाहकाला आता तू बारामतीला ये असे सांगण्यात आले.
मात्र, पुढचा प्रवास करताना वाहकाला काही सुचेना कोणीतरी बारामती पोलिसांना याबाबतची सूचना दिली होती. एसटी दुपारी १२.३० वाजता बारामती डेपोमध्ये आली मात्र तो कोरोंटाईनचा शिक्का असणारा अनोळखी इसम गेला कुठे याचा विचार करताना अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकला आणि ती व्यक्ती कुठे गेली असेल हे काही कळेना.
पोलिसानी चौकशी केल्यावर तो व्यक्ती रिक्षाने गेल्याचे समजले. मग रिक्षावाल्याचा तपास लावत पोलिसांनी त्या व्यक्तीला सोडलेला परिसर दाखवला मग पोलिसांनी त्या भागातील घरोघरी जाऊन दार उघडून याबाबत चौकशी केल्यावर त्या व्यक्तीचा तपास लागला. पोलिसांनी नगरपालिकेचे क्षेत्रीय अधिकारी बोलावून त्या व्यक्तीला बारामती शहरातील सिल्व्हर ज्युबली हॉस्पिटलमध्ये तपासणी करण्यात आले.
याबाबत माहिती घेतली असता ही व्यक्ती दिल्ली येथून पुण्यात विमानाने आली असून त्यांना विमानतळावर कोरोंटाईनचा शिक्का मारण्यात आला आहे. त्यांची सरकारी रुग्णालयात तपासणी करून त्यांना आता चौदा दिवसांसाठी होम कोरोंटाईन करण्यात आले असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ सदानंद काळे यांनी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव