History of @ Symbol, 13 फेब्रुवारी 2022: कधी कधी असं घडतं की काही शोध किंवा अविष्कार चुकीच्या वेळी घडतात. उदाहरणार्थ टिन ओपनर. जे टिन बनवण्याच्या 50 वर्षांपूर्वी बनवलं गेलं होतं. पहिले फॅक्स मशीन 1843 मध्ये बनवले गेले. @ चिन्हाचा शोध पाच शतकांपूर्वी लागला होता. पण त्या काळी तुम्ही @ टाकून कोणाला टॅग करू शकत नव्हता. तसंच @ करून कोणावरही टीका करता येत नव्हती. या चिन्हाचा शोध बऱ्याच पूर्वी लागला असला तरी आज जसा या चिन्हाचा वापर करत आहोत तो वापर त्याकाळी केला जात नव्हता.
आपल्या माहितीनुसार, @ चिन्ह प्रथम ईमेलमध्ये जोडले गेले. पण त्याचा वापर 1536 मध्येच सुरू झाला. पण त्यावेळी राजा हेन्री-8 ला टॅग करण्यासाठी कोणीही त्याचा वापर केला नाही. कारण त्याने अनेकांचे शिरच्छेद केले होते. वास्तविक @ चिन्ह सुरुवातीला प्रति युनिट किंमतीसाठी वापरलं जात होतं. बरं, याबद्दल तीन कथा आहेत … त्या जाणून घेऊया
आळशी मॉन्क्स ने शोधले @ ला
6व्या आणि 7व्या शतकात, @ या खुणा काही आळशी मॉन्क्सनी (Lazy Monks) बनवल्या होत्या. अंतहीन हस्तलिखिते हाताने कॉपी करू नयेत हा हेतू होता. म्हणूनच मॉन्क्सना शॉर्टकट हवा होता. म्हणूनच शॉर्टकटसाठी लॅटिन शब्दांचा अवलंब केला. Toward किंवा at (ad) सोबत a जोडला ज्याच्या माग d ला एका लांब शेपटी प्रमाणं जोडलेलं गेलं, ज्याला @ म्हंटलं जातं.
पत्रकारांच्या शॉर्टहँडचा परिणाम होता @
एक कथा असंही सांगते की ते प्रथम फ्रेंच पत्रकारांनी वापरलं होतं. त्यांनी at लहान करण्यासाठी (à) वापरले. त्यांचा यामागचा उद्देश म्हणजे वेळ वाचवणं. जे हळूहळू @ मध्ये बदलले, कारण फ्रेंच पत्रकार त्यावेळी फारसे लिहिण्याच्या मनस्थितीत नव्हते. पण आज @ चा अर्थ आहे त्यावेळीही अगदी तोच होता.
व्यवसाय पत्रात प्रथम वापर
असाही एक सिद्धांत आहे की @ प्रथम दस्तऐवजात वापरला गेला होता. जे 1536 चे आदस्तऐवज. फ्लोरेंटाईन व्यापारी फ्रान्सिस्को लापी यांनी लिहिलेलं ते पत्र होतं. each atसाठी शॉर्टकट पर्याय म्हणून त्यांनी त्याचा लघुलेखनात वापर केला. जसं- 14 लिंबू @ $10. त्यानं a आणि e चे मिश्रण करून @ बनवलं. शतकानुशतके हे चिन्ह पुन्हा वापरलं गेलं नाही. महत्त्वाचं म्हणजे कम्प्युटर सायंटिस्ट रे टॉमलिन्सन यांनी 1971 मध्ये याचा वापर केला.
रे टॉमलिन्सन (Ray Tomlinson)यांना Arpanet system शी जोडलेल्या संगणकांना ईमेल पाठवण्याचं काम देण्यात आलं. हे करण्यासाठी एक मार्ग शोधण्यास सांगितला. आर्पानेट हे इंटरनेटचे जनक होते. किंवा फक्त असं म्हणा की सुरुवातीचं इंटरनेट जे फारसं प्रगत नव्हतं. फक्त काही मर्यादित लोक ते वापरू शकत होते. मग रे टॉमलिन्सनने व्यक्तीच्या नावापुढे @ टाकून त्याच्या कम्प्युटर्स चा क्रमांक किंवा नाव जोडलं. यामुळं संदेश एका संगणकावरून दुसऱ्या संगणकावर जाऊ लागला.
रे टॉमलिन्सनने स्मिथसोनियनला सांगितलं की तो फक्त एक चिन्ह शोधत आहे. ज्याचा कमीत कमी वापर झाला आहे. काही संशोधनानंतर @बद्दल कळलं. म्हणून त्याने त्याचा उपयोग आपल्या अर्पानेट सिस्टमला संदेश पाठवण्यासाठी केला. तेव्हापासून आजपर्यंत @ इंटरनेटच्या जगात एक मोठा आधार म्हणून आहे. हा अहवाल नुकताच IFLScience मध्ये प्रसिद्ध झाला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे