गोल पोस्ट विचार करू नका 🤔🤔 फक्त बघा 🤓🤓 कधी जाशील मेल्या कोरोना तू

कधी जाशील मेल्या कोरोना तू

फू बाई फू फुगडी फू
कधी जाशील मेल्या
कोरोना तू रे कोरोना तू

आज बंद उद्या बंद
बंद किती बंद,
आज बंद उद्या बंद
बंद किती बंद,
कारण नसताना बाहेर फिरतात,
ते सगळे मंद…

आत्ता फुगडी फू…
फू बाई फू फुगडी फू
कधी जाशील मेल्या
कोरोना तू रे कोरोना तू

नोकरी नाही छोकरी नाही
सगळाच झालाय वांदा
नोकरी नाही छोकरी नाही
सगळाच झालाय वांदा
करून पण देईना तू
आता कुठलाच धंदा

आता फूगडी फू….
कधी जाशील मेल्या
कोरोना तू रे कोरोना तू

शाळा नाही परीक्षा नाही
पोर झालेत फाजील
शाळा नाही परीक्षा नाही
पोर झालेत फाजील
कधी मेल्या एकदाचा
तू निघून जाशील

आता फूगडी फू….
कधी जाशील मेल्या
कोरोना तू रे कोरोना तू

तुझ्या पुढे सरकार आमच
झालं आहे हतबल
तुझ्या पुढे सरकार आमच
झालं आहे हतबल
मारायला तुला आता
येईल आमचा बिरबल ( वॅक्सीन )

आता फूगडी फू….
कधी जाशील मेल्या
कोरोना तू रे कोरोना तू

किरण कानडे

error: Content is protected !!
Exit mobile version