जी. एस. पी. एम. कॅम्पसमध्ये शिवजयंती निमित्त मशाल रॅली व शिवव्याख्यान संपन्न

9

उदगीर, २१ फेब्रुवारी २०२४ : जीएसपीएम या शैक्षणिक संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या वर्षीही शिवजन्मोत्सवाची सुरुवात सकाळी ६. ३० वाजता संस्थेचे सचिव अमित राठोड व सर्व विभागाच्या प्राचार्यांच्या उपस्थितीत उदागीर बाबा महाराज यांच्या समाधीस्थळी अभिषेक करून मशाल पेटवून करण्यात आली. पुढे ही मशाल रॅली चौबारा- पोलीस स्टेशन – नगर परिषद मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आली असता मशाल रॅलीचे स्वागत जिल्हा परिषदेचे माजी सभापती बापूराव राठोड, माजी सभापती सौ ज्योतीताई राठोड, मनसे जिल्हाध्यक्ष संजय राठोड व इतर मान्यवरानी केले. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एस. आर. इन्स्टीटयुट ऑफ डिप्लोमा इन फार्मसी उदगीरच्या विद्यार्थ्यांनी लेझीमचे व झेंडयाचे अप्रतिम प्रात्यक्षिक दाखविले. पुढे ही रॅली कॅप्टन चौक – आवटे पेट्रोल पंप – बोधन नगर – जळकोट रोड मार्गे जी. एस. पी. एम. कॅम्पस येथे आली. रॅलीच्या आगमनानंतर जी. एस. पी. एम. कॅम्पसमध्ये शिवव्याख्यानाच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. या कार्यक्रमास अनेक मान्यवरांसह उदगीर येथे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सुधाकर नाईक