कॉमेंट्री करत असतानाच रिकी पाँटिंगची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल

30

पर्थ, २ डिसेंबर २०२२ ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि फलंदाज रिकी पाँटिंग यांची तब्येत अचानक बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एजन्सीकडून मिळालेल्या माहितीनुसार, पर्थमध्ये ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिला कसोटी सामना सुरू आहे. या सामन्या दरम्यान, रिकी पाँटिंग कॉमेंट्री करत होते. मात्र अचानक छातीत दुखायला लागल्यानतंर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. पाँटिंग यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

पॉन्टिंग यांचे आंतरराष्ट्रीय करिअर:

रिकी पॉटिंगने यांनी १६८ कसोटी सामने खेळले असून ५८.८५ च्या सरासरीने १३ हजार ३७८ धावा केल्या आहेत. यात ४१ शतके आणि ६२ अर्धशतकांचा समावेश आहे. तर वनडे क्रिकेटमध्ये ३७५ सामन्यात ४२.०३ च्या सरासरीने १३ हजार ७०४ धावा केल्या आहेत. यासोबतच टी २० सामन्यात ४०१ धावा देखील केल्या आहेत. २००३ आणि २००७ मध्ये त्याच्या नेतृत्वाखालीच ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप देखील जिंकला आहे.

दरम्यान, यापूर्वी ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. वयाच्या ५२ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा