कोण आहे नॅन्सी पेलोसी? अमेरिकन स्पीकर ज्यांची जगभरात होत आहे चर्चा

पुणे, ४ ऑगस्ट २०२२: अमेरिकेच्या स्पीकर नॅन्सी पेलोसी यांनी चीनच्या सर्व धमक्यांदरम्यान तैवानमध्ये पोहोचून संपूर्ण जगाला आश्चर्यचकित केलं. लाख प्रयत्न करूनही चीनला त्यांची तैवान भेट थांबवता आली नाही. ही पहिलीच वेळ नाही, जेव्हा नॅन्सी यांनी अचानक लोकांना धक्का बसण्यास भाग पाडलं. याआधीही अशा अनेक घटना घडल्या आहेत, जेव्हा त्यांच्या नावाचा आवाज संपूर्ण जगात एकाच वेळी गुंजला होता. चला जाणून घेऊया कोण आहे नॅन्सी पेलोसी?

८२ वर्षीय नॅन्सी पेलोसी या पाच मुलांची आई आणि नऊ मुलांची आजी आहे. पेलोसी अनेकदा म्हणतात की सार्वजनिक क्षेत्रात (राजकारण) प्रवेश करण्याचा त्यांचा कधीच हेतू नव्हता. मात्र, त्या राजकीय घराण्यातील आहेत.

नॅन्सीचे वडील थॉमस डी’अलेसेंड्रो ज्युनियर यांनी बाल्टिमोरचे महापौर म्हणून काम केले आहे. त्यांनी पाच वेळा काँग्रेसमध्ये शहराचं प्रतिनिधित्व केलं. नॅन्सीचा भाऊ थॉमस डी’अलेसेंड्रो तिसरा यानेही बाल्टिमोरचे महापौर म्हणून काम केलं. पेलोसी अनेकदा त्यांच्या वडिलांच्या निवडणूक प्रचारात भाग घेत असे. त्यांच्याकडं मतं मिळवण्याची हातोटी आहे.

माजी ओबामा मुख्य रणनीतिकार डेव्हिड अजेलरॉड यांनी एकदा नॅन्सी यांना विचारलं की त्या त्यांच्या वडिलांकडून काय शिकल्या. त्याला उत्तर देताना पेलोसी म्हणाल्या की मी त्यांच्याकडून मतं गोळा करायला शिकलेय.

नॅन्सींनी कधी दाखवली त्यांची ताकद?

१. इराक युद्धापासून ते २००८ पर्यंतच्या आर्थिक संकटाचा सामना करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

२. ओबामाकेअर विधेयक मंजूर करताना बराक ओबामांना जोरदार पाठिंबा.

३. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधातील डेमोक्रॅटचा चेहरा बनवल्या.

जानेवारी २००७ मध्ये सभापती

पेलोसी १९८७ मध्ये पहिल्यांदा सभागृहात निवडून आल्या. तेव्हा ४३५ सदस्यांच्या सभागृहात केवळ २३ महिला प्रतिनिधी होत्या. जानेवारी २००७ मध्ये, पेलोसी सभागृहाच्या पहिल्या महिला स्पीकर बनल्या. पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं की, २०० वर्षांहून अधिक काळापासून मी या दिवसाची वाट पाहत आहे.

ओबामाकेअर

रुझवेल्ट, ट्रुमन, केनेडी, जॉन्सन आणि क्लिंटन यांच्यासह अनेक राष्ट्राध्यक्षांना त्यांच्या सकारात्मक हेतू असूनही अमेरिकेत सर्वसमावेशक राष्ट्रीय आरोग्य सेवा कार्यक्रम राबवता आला नाही. पण बराक ओबामा यांनी पदभार स्वीकारताच त्यांनी परवडणाऱ्या केअर कायद्याला पुढे नेण्याचा प्रयत्न केला, ज्याला ओबामाकेअर असेही म्हणतात. हे विधेयक मंजूर करण्यात नॅन्सी पेलोसी यांचा मोठा वाटा होता.

२००८ आर्थिक संकट

जेव्हा आर्थिक संकटामुळं अमेरिकन अर्थव्यवस्थेला जागतिक मंदी आली तेव्हा बहुतेक डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते बुश सरकारला मदत करण्याच्या बाजूने नव्हते. पुढच्या निवडणुकीला त्यांच्याकडं फक्त दोन महिने उरले होते. पण पेलोसीने अमेरिकेच्या ट्रेझरी सेक्रेटरींना फोन केला आणि अर्थव्यवस्थेचे काय चालले आहे हे सांगण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी भेटायला बोलावलं. राजकीय प्राधान्यक्रम बाजूला ठेवून, पेलोसीने इतिहासातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट बेलआउटचे समर्थन केलं. ज्याला रिपब्लिकन गट आणि सामान्य डेमोक्रॅट्स या दोन्ही पक्षांच्या विरोधाचा सामना करावा लागला.

डोनाल्ड ट्रम्प यांचा निषेध

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात उभे राहणारी पेलोसी ही शेवटची व्यक्ती होती. पेलोसी यांनी हे सुनिश्चित केलं की ट्रम्प हे दोनदा महाभियोग चालवले जाणारे अमेरिकेचे एकमेव अध्यक्ष आहेत. त्यांचा कार्यकाळ संपण्याच्या केवळ सात दिवस आधी दुसरा प्रयत्न करण्यात आला. एकीकडं त्यांच्या तडफदार व्यक्तिमत्त्वाने त्यांना कायमच विरोधकांच्या निशाण्यावर ठेवलं आहे, तर दुसरीकडं त्यांच्या चाहत्यांचीही कमी नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा