गोल पोस्ट आंतरराष्ट्रीय कोण आहे हा प्रज्वल पांडे…

कोण आहे हा प्रज्वल पांडे…

ब्रिटन, ३० ऑक्टोबर २०२२ : प्रज्वल पांडे ऋषी सुनक यांच्या कोअर कमिटीमध्ये दाखल झाल्यापासून कोण प्रज्वल पांडे म्हणून अनेकांनी भुवया उंचावल्या. तर त्याचं उत्तर आहे.. ऋषी सुनक यांच्या कमिटीमधला सर्वात तरुण युवक…

प्रज्वल पांडे हा मुळचा बिहारमधला सिवान जिल्ह्यातल्या जमापूर गावातला एक १९ वर्षाचा तरुण आहे. प्रज्वल पांडे हा ब्रिटनच्या कम्युनिस्ट पार्टीचा सदस्य आहे. तर २०१९ मध्ये तो UK YUDDH या पार्टीचा सदस्य म्हणून निवडला गेला होता. त्यावेळी त्याने ब्रिटनच्या संसदेत पहिल्यांदा भाषण केलं होतं. तेव्हापासून ब्रिटनचे नागरिक प्रज्वल पांडेचे फॅन झाले आहेत.

प्रज्वल हा मूळचा भारतीय असून झारखंडमधल्या सिंद्रीमध्ये रहात आहे. सांगण्यास अत्यंत आनंद होतो की प्रज्वल हा भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या गावचा रहिवासी आहे. त्यामुळे राजकारण त्याच्या नसानसात आहे, असं म्हणावं लागेल.

प्रज्वल हा गणित आणि इकॉनॉमिक्स विषयाचा अभ्यास करत असून आता तो ब्रिटनच्या ऋषी सुनक यांच्यासाठी आता काम करणार आहे. त्यामुळे आता ब्रिटनच्या मंत्रिमंडळात लवकरच दोन नव्हे तर अनेक भारतीयांचा नंबर लागेल, अशी आशा करायला हरकत नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

error: Content is protected !!
Exit mobile version