गोल पोस्ट इतर राजकारण कोण सुषमा अंधारे? प्रताप सरनाईक

कोण सुषमा अंधारे? प्रताप सरनाईक

मुंबई, १६ ऑक्टोंबर २०२२: शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील भाषणामुळे सुषमा अंधारे हे नाव जास्तच चर्चेत आलं. त्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा सातत्याने शिंदे, फडणवीस सरकारवर हल्लाबोल सुरूच आहे. मोदींची मिमिक्री केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला. तरी पण अंधारे यांचं टीका करायचं सत्र सुरूच आहे. दरम्यान अंधारे यांच्या टीकेला शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

प्रताप सरनाईक यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मला लोकांची विकास कामे करायची आहेत. या सुषमा अंधारे कोण आहेत? ज्यांनी काल पक्षात प्रवेश केला आणि आज बोलत आहेत. पक्षात येण्यापूर्वी त्यांनी अनेकदा शिवसेना आणि शिवसेनाप्रमुखांवर टीका केली आहे.

अशी जर एखादी व्यक्ती मीरा-भाईंदर शहरात येऊन काहीही बोलत असेल तर ते चुकीचं आहे. सुषमा अंधारे यांनी आधी आपला इतिहास पहावा. आपण इथपर्यंत कशा पोहोचलो, आपण कोणाबद्दल बोलत आहोत याचा अंधारे यांनी विचार करावा तसेच प्रताप सरनाईक पुढे बोलतात की, मला सुषमा अंधारे यांच्याबद्दल जास्त काही बोलायचं नाही. मला मिरा भाईंदर चा विकास करायचा आहे. तर प्रताप सरनाईक यांच्या टीकेला आता सुषमा अंधारे आणि ठाकरे गट काय प्रत्युत्तर देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

error: Content is protected !!
Exit mobile version