कोलकाता नाइट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स कोण आहे श्रेष्ठ? पहा संपूर्ण बातमी

दुबई, २३ सप्टेंबर २०२०: मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात आज आयपीएल २०२० चा ५ वा सामना रंगणार आहे. हा सामना अबू धाबी मधील शेख जायद स्टेडियम मध्ये रंगणार आहे. आयपीएल २०२० मध्ये मुंबई इंडियन्सचा २ रा सामना असणार आहे. तसेच कोलकाता नाइट रायडर्स हा संघ यंदा पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे. मुंबई इंडियन्स संघाला पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाकडून पराजयाचा सामना करावा लागला होता. यामुळे कर्णधार रोहित शर्मा याच्यासाठी हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे. हा सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल.

आयपीएलच्या इतिहासात दोन्ही संघ २५ वेळा समोर आले आहेत. ज्यात १९ वेळा मुंबई इंडियंस संघाला विजय मिळवण्यात यश आले आहे. आणि उर्वरित ६ सामन्यांमध्ये कोलकाताच्या संघाला विजय मिळवण्यात यश आले आहे. असं पाहायला गेलं तर मुंबईच्या संघाचे पारडे जड आहे.

मुंबई इंडियन्स आणि कोलकता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये बिग हीटर्सची कमी नाही आहे. या सामन्यात फलंदाजीची चांगलीच चुरस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून शुबमन गील आणि अंद्रे रसल आणि मुंबई कडून “हिट मैन” रोहित शर्मा, हार्दिक पंड्या तसेच कायरोन पोलार्ड या फलंदाजांची फलंदाजी प्रेक्षकांसाठी मेजवानीच असेल.

कोलकाता नाइट रायडर्स संघामध्ये दिनेश कार्तिक (कप्तान), इयोन मोर्गन, नीतिश राणा, राहुल त्रिपाठी, रिंकू सिंह, शुभमन गिल, सिद्धेश लाड, अली खान, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्र्युसन, पैट कमिंस, प्रसिद्ध कृष्णा, संदीप वारियर, शिवम मावी, वरूण चक्रवर्ती, आंद्रे रसेल , क्रिस ग्रीन, एम सिद्धार्थ, सुनील नारायण, निखिल नाईक, टॉम बेंटोन. यांचा समावेश आहे.

मुंबई इंडियन्सच्या संघात  रोहित शर्मा (कप्तान), आदित्य तारे, अनमोलप्रीत सिंह, अनुकूल रॉय, क्रिस लिन, धवल कुलकर्णी, दिग्विजय देशमुख, हार्दिक पंड्या, ईशान किशन, जेम्स पेटिसन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कीरोन पोलार्ड, कृणाल पंड्या, मिशेल मैक्लीनागन, मोहसिन खान, नाथन कूल्टर नाइल, प्रिंस बलवंत राय, क्विंटोन डि कॉक, राहुल चाहर, सौरभ तिवारी, शेरफेन रदरफोर्ड, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट यांचा समावेश आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा