कोण करणार सामान्यांचा विचार; मतासाठी गाव पुढारी झाले लाचार

अहमदनगर.१७.मे.२०२०: मुंबई-पुण्यासह विविध शहरातून आलेल्या स्थलांतरीत नागरिकांची प्रशासनाला कोणतीही माहिती न देता त्यांचा गावात खुलेआम वावर सुरु असल्याचे चित्र बहुतेक गावांत पाहवयास मिळत आहे. याचे कारण म्हणजे ग्राम सुरक्षा समिती अर्थात ती चालविणारे गावपुढारी मतांसाठी लाचार झालेले आहेत! विशेष म्हणजे गावचा माणूस घरात अन हा शहरी बाबूच लॉकडाऊनध्ये गावांत रुबाब करताना दिसत आहे.

गावांत बाहेरून आलेल्या व्यक्तींची माहिती प्रशासनापासून लपवून ठेवण्याचे प्रकार सर्रास सुरु आहेत. अन हे सारे गावात काही महिन्यांनी होणार्‍या ग्रामपंचायत व सेवा सोसायट्यांच्या निवडणुकीत आपल्या पदरात मतदान पाडून घेण्यासाठी हे गावपुढारी लाचार झाले आहेत कारण हे आलेले शहरी बाबू गावातील स्थानिक मतदार वा त्यांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये संबंधीतांकडे मतांचा जोगवा मागायला जावे लागणार हा त्यामागचा सरळसरळ हिशोब आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनासह गावपातळीवर विविध उपाययोजना आखल्या गेल्या आहेत.

पहिल्या दोन टप्प्यात गावपातळीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यास चांगल्यापैकी यशही आले. मात्र आता चालू असलेल्या तिसर्‍या टप्प्यात व येणार्‍या चौथ्या टप्प्यात मूंबई-पुणेकरांसह विविध शहरातून येणारे लोंढे गावांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. जे व्यवसाय वा नोकरीनिमित्त शहरात स्थायिक झालेले आहेत. त्यांना गावात येऊ देण्याबद्दल कुणाचे काही दुमत असण्याचे कारण नाही पण कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्या आवश्यक त्या चाचण्या करणे गरजेचेच आहे. पण त्याकडे सर्रास दुर्लक्ष होताना दिसत आहे.

गावात आल्यानंतर त्यांची माहिती प्रशासनाला व आरोग्य विभागाला कळविणे ही खरे तर ग्रामसुरक्षा समितीची जबाबदारी असते. सदर व्यक्तींना गावांतील शाळेत चौदा दिवस विलगीकलण कक्षात ठेवण्यात येत आहे. पण जिल्हा तील तालुक्यातील परिस्थिती माञ वेगळीच बाराखडी वाचत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी:जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा