कोण जिंकणार ….कोण हरणार…. अखेर कोण होणार राष्ट्रपती…

मुंबई, १८ जुलै २०२२: राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक आज जोशात पार पडली. त्यात सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यात कोण बाजी मारणार हे २१ जुलैला समजणार आहे. पण यासाठी मात्र द्रौपदी मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांच्यात चुरस सुरु आहे.
द्रौपदी मुर्मू यांना भाजप आणि शिवसेनेचा पाठिंबा जाहीर झाल्यानंतर ६१ टक्के मतांची भरती त्यांच्या खात्यात झाली. पण अजूनही स्थिती तळ्यात मळ्यात आहे.

राष्ट्रपतीपदासाठीची मतदान प्रक्रिया जोरात सुरु झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत मतदान केले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत मतदानाचा हक्क बजावला. विरोधी पक्ष नेते अजित पवार तर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांनीही राष्ट्रपतीपदासाठी मतदान केलं. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही गोव्यात मतदान केले.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्हिलचेअरवर येऊन मतदानाचा हक्क बजावला. भाजपच्या हेमामालिनी यांनी दिल्लीत राष्ट्रपतीपदासाठी मतदान करुन आपले कर्तव्य पार पाडले. तर अमित शहा, पियुष गोयल, नरेंद्र सिंग तोमर यांनीही दिल्लीत मतदान केले. अनुराग ठाकूर आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांचे मतदानही महत्त्वाचे ठरले.

पंजाबमध्ये आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांनी यशवंत सिन्हा यांना पाठिंबा दर्शविला होता. याच काँग्रेस नेत्यांनी आणि आम आदमीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी मतदान केले.
त्या मतदानामध्येही मुंबईत भांडण सुरु असल्याचं चित्र दिसून आलं. यावेळी लोणीकरांनी नितीन राऊत यांच्यावर रांग मोडल्याचा आरोप केला. गेले एक तास आम्ही रांगेत उभे होतो, मात्र यावेळी नितीन राऊत मध्ये येऊन त्यांनी मतदान केले असल्याने, त्यांच्या मतदानावर आमचा आक्षेप असल्याचं लोणीकरांनी सांगितलं.
एकुणातच या प्रक्रियेकडे आणि २१ जुलैला लागणाऱ्या निकालाकडे सर्व जगाचे लक्ष लागले आहे. जर या निवडणुकीत द्रोपदी मुर्मू राष्ट्रपती म्हणून निवडून आल्या, तर सर्वात कमी वयाच्या आदिवासी महिला राष्ट्रपती म्हणून त्यांच्या नावे नवीन रेकॉर्ड तयार होईल. पुन्हा एकदा भाजपचे बळ वाढून, भारताच्या विकासाच्या कक्षा रुंदावतील असा विश्वास जनतेकडून व्यक्त केला जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा