एसटी भाडेवाढीचा निर्णय कुणाचा? परिवहनमंत्र्यांच्या अनभिज्ञतेचा दावा चव्हाट्यावर!”

30

पुणे २८जानेवारी २०२५: एसटी तिकीटदरात तब्बल १४.९५ टक्के वाढ झाल्याने प्रवाशांमध्ये असंतोष उसळला असतानाच, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या “या निर्णयाची माहितीच नाही” या दाव्यामुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. त्यांनी हा निर्णय आपल्या संमतीशिवाय झाल्याचा आरोप करत, संपूर्ण जबाबदारी परिवहन आयुक्तांवर ढकलली आहे.

राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला, मात्र कोणत्याही अधिकाऱ्यांनी यावर भाष्य करण्यास नकार दिल्याने हा प्रकरण आणखी गोंधळात भर घालत आहे. प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले, “एसटी भाडेवाढीचा कोणताही प्रस्ताव माझ्यापर्यंत पोहोचलेलाच नाही. हा निर्णय परिवहन आयुक्तांनी घेतला आहे.”

परिवहन आयुक्त संजय सेठी यांच्याशी याबाबत प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. या अनाकलनीय शांततेमुळे विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे . एसटीसारख्या महत्त्वाच्या सेवेत गुपचूप निर्णय होणे म्हणजे नागरिकांच्या विश्वासाला धोका पोहोचवण्यासारखे आहे,” असे मत विरोधकांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, प्रवाशांमध्येही प्रचंड नाराजी आहे. “अशा अचानक दरवाढीने प्रवाशांची आर्थिक ओझी वाढणार आहेत,” असे मत काही प्रवाशांनी नोंदवले.

सरकारची असंवेदनशीलता, निर्णय घेण्यामागचे अपारदर्शक धोरण, आणि मंत्र्यांचा या प्रक्रियेपासून अलगाव यामुळे वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. आता पुढील पावले कोणती असतील याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा