महाराष्ट्र व कामगार दिन 1 मे लाचं का साजरा केला जातो? काय आहे त्यामागचा इतिहास जाणून घ्या.

20
1 May Maharashtra Day and Workers Day Celebrate
महाराष्ट्र व कामगार दिन 1 मे लाचं का साजरा केला जातो.

प्रथमेश पाटणकर, न्यूज अनकट प्रतिनिधी

1 May Maharashtra Day and Workers Day: दरवर्षी संपूर्ण राज्यात १ May हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस मराठी माणसाच्या अस्मितेचा, शौर्याचा आणि एकतेचा एक सण म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सर्वांना सर्वजाणिक सुट्टी दिली जाते. याशिवाय वेगवेगळ्या ठिकाणी या दिवशी सांस्कृतिक,सामाजिक तसेच शासकीय कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. शाळा,कॉलेजेस मध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. या दिवशी महजजेच १ मे ला महाराष्ट्राच्या बलिदानासाठी १०६ हुतम्यानी बलिदान दिले होते. त्यांना या दिवशी श्रद्धांजली अर्पण केली जाते. चला तर मग महाराष्ट्र आणि कामगार दिनाचा इतिहास जाणून घेऊया.

महाराष्ट्र दिनाचा इतिहास :

१ मे या दिवशी संपूर्ण राज्यातील लोक एकत्र येत आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने साजरा करतात. स्वातंत्र्यापूर्वी मुंबई प्रांत होता. त्यात गुजरात व महाराष्ट्र ही आत्ताची दोन्ही राज्ये होती. त्यानंतर दोन्ही राज्यात भाषावार प्रांत रचनेच्या मागणीला जोर धरू लागला. मराठी लोकांना मराठी भाषिकांचे स्वतंत्र्य राज्य हवे होते तर गुजरातला गुजराती भाषेचे राज्य हवे होते. या काळात गुजारत मधील काही नेत्यांनी मुंबई शहर गुजरात राज्याला जोडण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मुंबईसह महाराष्ट्राच्या निर्मितीच्या मागणीला जोर धरू लागली. त्यावेळी मराठी भाषा बोलणारे लोक गुजरातमधील डांग आणि उंबरगाव भागातही होते. ते कर्नाटकाच्या सीमेवरही होते. त्यामुळे बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी आणि गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे या मागणीनं उचल खाल्ली आणि संयुक्त महाराष्ट्राचा एक मोठा लढा उभा राहिला.

मुंबईसह महाराष्ट्र स्वतंत्र कऱण्यासाठी जोरदार आंदोलन सुरु झाले. मुंबई राज्याचे त्यावेळचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांना गोळ्या झाडण्याचे आदेश देण्यात आले होते. मुंबईच्या रस्त्यावर रक्ताचा चिखल झाला.त्यावेळी संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या लढ्यात १९५७ पर्यंत १०६ आंदोलकांना आपल्या जीव गमवावा लागला होता. अखेर या आंदोलनाला यश आलं. १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली.

कामगार दिन व त्याचा इतिहास :

१ मे हा दिवस आपण कामगार दिन म्हणून साजरा करतो. १ मे १८८६ रोजी दिवसाच्या कामाचे तास आठ करावे या मागणीसाठी शिकागो येथे आंदोलन करण्यात आल होते. त्यावेळी जी रॅली काढण्यात आली होती त्यावर बॉम्बस्पॉट करण्यात आला होता. त्यानंतर या आंदोलनाला आणखीन हिंसक वळण मिळाल.याच दरम्यान पोलिस अधिकार आणि आंदोलक गंभीर जखमी झाले. यानंतर कामगाराच्या लढ्यासाठी कामगार चळवळीने चालना दिली.