देशात पेट्रोल १५ रुपये लिटरने मिळेल असे नितीन गडकरी का म्हणाले ?

राजस्थान, ५ जुलै २०२३: मी ऑगस्ट महिन्यात टोयोटा कंपनीची वेगळी वाहने लाँच करत आहे. आता सर्व वाहने शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर चालणार आहेत. यानंतर देशात पेट्रोल प्रति लीटर १५ रुपये होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.

गडकरी यांनी पेट्रोल स्वस्त होण्यामागील कोणते सूत्र सांगितले ते पाहू,
राजस्थानमधील प्रतापगढ येथील सभेत बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, आता सर्व वाहने शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या इथेनॉलवर चालतील. जर सरासरी ६०% इथेनॉल आणि ४०% वीज घेतली तर पेट्रोल १५ रुपये लिटर दराने मिळेल. याचा फायदा देशातील जनतेला होणार आहे. या धोरणामुळे प्रदूषणात घट होईल तसेच शेतकरी अन्नदात्यापासून ऊर्जादाताही बनेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला आहे.

काँग्रेसने गरिबी हटावचा नारा दिला होता. मात्र इतकी वर्षे राज्य करुनही त्यांना गरिबी हटवता आली नाही. त्यांच्या काळात एक गोष्ट नक्कीच घडली की, काँग्रेसने आपल्याच लोकांची गरिबी दूर केली, असा टोलाही नितीन गडकरी यांनी यावेळी लगावला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा