गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा कौटूंबिक वादातून पत्नीचे निधन, पतीनेही केला आत्महत्येचा प्रयत्न

कौटूंबिक वादातून पत्नीचे निधन, पतीनेही केला आत्महत्येचा प्रयत्न

लातूर, दि.१८ मे २०२०: सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितीने विष प्राषण केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी मुरुड परिसरात घडली होती. त्यावेळी उपचारादरम्यान पत्नीचे निधन झाले होते. ही बातमी समजताच पतीनेही विषारी द्रव्य प्राशन केले. त्याच्यावर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, निलंगा तालुक्यातील एका तरुणीचा मुरुड शहरातील एका तरुणाशी काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. परंतु सासरच्या त्रासाला कंटाळून ही विवाहिता माहेरी गेली होती. काही दिवसांपूर्वी तिच्या वडिलांचे निधन झाले आणि त्यांनी मृत्युपूर्वी मुलीला सासरी जाण्याचा सल्ला दिला होता.

वडिलांचा शेवटचा शब्द पाळण्यासाठी अन्य नातेवाईकांसह ती सासरी आली खरी , मात्र तिचा त्रास काही कमी झाला नाही. अखेर, या विवाहितेने शुक्रवारी विषारी द्रव्य प्राषण केले. तिच्यावर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असताना तिचे निधन झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. हि माहिती मिळताच पतीनेही रॉकेल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावरही लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version