कॅनडातील जंगलात भीषण आग तर आणीबाणीची घोषणा

11

पुणे, ७ मे २०२३ : कॅनडातील अल्बर्टा प्रांतात असलेल्या जंगलात भीषण आग लागली. युनायटेड कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे प्रमुख डॅनियल स्मिथ यांनी आणीबाणी जाहीर केली आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत २४ हजारांहून अधिक लोकांची सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले. आगीमुळे येथील तापमानातही वाढ झाली. जंगलामध्ये तेलाच्या पाइपलाइनही असल्यामुळे त्याबद्दल अजून तणाव वाढला आहे. सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या असल्या तरी आग नियंत्रणाबाहेर आहे.

अल्बर्टा प्रांतात आत्तापर्यंत ११० आगी पेटल्या आहेत. त्यापैकी ३६ नियंत्रणाबाहेर आहेत. वाइल्डफायरच्या प्रवक्त्या क्रिस्टी टकर यांनी सांगितले की, येथील लोक वारा आणि तीव्र उष्णतेशी लडत आहेत. जोरदार वाऱ्याने आग वेगाने पसरत असल्यामुळे अग्निशमन दलाला बचावकार्य कठीण जात आहे. क्युबेक आणि ओंटारियो येथून अग्निशमन दलाची पथके पाठवण्यात आली आहेत.

फॉक्स लेकच्या आगीत २० घरे आणि पोलीस ठाणेही जळून खाक झाली आहेत. डॅनियल स्मिथ यांनी सांगितले की, याआधी कधीही इतकी भीषण आग लागली नव्हती. यावेळी अनेकांना हाकलून देण्यात आले आहे. मदत कार्यासाठी १.५ अब्ज कॅनेडियन डॉलर्सची व्यवस्था करण्यात आली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड