वन्य प्राणी जीव विशेष – भाग ३ सर्प

25

मराठी_नाव -: मण्यार
विदर्भ :- दांड्या काडीचा साप, दांडेकर
इंग्लिश_नाव -: common krait
शास्त्रीय_नाव -: bungarus caeruleus

सरासरी_लांबी -: १०० सें.मी. ( ३ फुट ३ इंच )
अधिकतम_लांबी -: १७५ सें.मी. ( ५ फुट ९ इंच )

रंगवआकार -: काळपट जांभळा किंवा निळा रंग. त्र वर एकेरी वा दुहेरी आडव्या पांढर्या पट्ट्या. पट्ट्या ह्या डोक्याकडे कमी तर शेपटाकडे गडद होत जातात. डोके पुर्तत: काळे,ओठ व पोटाचा रंग पांढरा.मऊ व चमकदार खवले. शरीर दंडगोलाकार, तसेच शरीरच्या मध्यभागचे पाठीवरचे खवले षट्कोनी.शेपूट आखूड.

प्रजनन -: मार्च -मे दरम्यान मादी ८-१२अंडी घालते. व साधारण दोन महिन्यानंतर त्यातून पिल्ले बाहेर पडतात. पिले सादा₹ण २५-२८ से.मी. आसतात.

खाद्य -: मुख्यतःदुसर्या जातीचे साप.क्वचित छोट्या मण्यारी.क्वचितप्रसंगी उंदीर, पाली,बेडूक

आढळ -: हा साप भारतात सर्वत्र आढळतो.

वास्तव्य -:बरेचदा वारुळे,उंदराची बिळे, पाणथळ जागा,व भातशेती तसेच मानवी वस्ती.

वैशिष्ट्ये -: निशाचर.दिवसा विश्रांती घेऊन रात्रीला भक्षाहाठी बाहेर पडतो.लाजाळू पण रात्री अतिशय चपळ. सहसा चावत नाही.

संदर्भपुस्तक -: साप, गुरुवर्य (निलीमकुमार खैरे)

सर्पदंश व लक्षणे

मण्यार या सापाचे दात लांबीला कमी आसतात,त्यामुळे झोपेत या सापाचा दंश झाल्याचे लक्षातसुद्धा येत नाही.(निशाचर आसल्याने या सापाचे ८५% दंश रात्रीला होतात व दात छोटे आसल्याने दंश झालेला लक्षातसुद्धा येत नाही)

(टीप :- झोपताना पलंग किंवा खाटेचा किंवा जमिनीपासून उंच जागी झोपावे, परिस्थितीपेक्षा जीवन मोलाचे आहे.)

मण्यार सापाचे विष नागापेक्षा तीव्र आसते. हे विष Neurotoxic प्रकारचे आसून ते प्राण्याच्या मज्जातंतू वर परिणाम करते.

या सापाचा दंश झाल्यास दंशाच्या ठिकाणी जळजळ होत नाही की सूज येत नाही. विषाच्या तीव्रतेनुसार काहीवेळाने मळमळल्यासारखे होते.अंग हलके पडते.तोंडातनं लाळ येतो व काही कालावधीतचं पोटात व सांध्यांत वेदना होऊ लागतात.

अंधश्रद्धा

१. मण्यार चावल्यास सांपाच्या आडव्या पट्ट्यांच्या संख्येएवठ्या गाठी प्राण्याच्या शरीरावर येतात.

उत्तर :- मण्या्र सापाच्या दंशानंतर अंगावर कोणत्याही प्रकारच्या गाठी येत नाही.

२. मण्यार साप चावल्यानंतर प्राण्यास दुसर्या दिवशीचा सूर्योदय पाहायला मिळत नाही..?

उत्तर :- खरे तर मण्यार साप हा निशाचर आसल्याने ,तो आपले भक्ष शोधण्याकरीता रात्रीला अधिवासातनं बाहेर पडतो. अशावेळी साप जर प्राणी वा माणूस जमिनीवर झोपला आसेल व साप जवळून जात आसेल व योगायोगाने आपल्या शरीराच्या कोणत्याही भागाचा धक्का त्यास लागला की दंश करतो. अशावेळी सापाने जर १० च्या नंतर दंश केला (लोक सहसा १० नंतर झोपतात). तर दंश केलेला रुग्णाच्या लक्षातपण येत नाही.(दात लहान आसल्यामुळे). व मण्यारीचे विष हळूहळू प्रभाव करते. साधारण अडीच ते तीन तासानंतर विष रुग्णाच्या शरीरभर पसरते व झोपेतच रुग्णाचा म्रूत्यू होतो. काहीवेळा पोटात व सांध्यांत वेदना होताना जाग आल्यास अशावेळीसूद्धा ८०% विष रुग्णाच्या शरीरात भिनलेले आसते. त्यामुळे रुग्ण दगावू शकतो.पण योग्य व वेळीच उपचार झाल्यास रुग्ण १००% बरा होतोच.

विनंती :- बिनविषारी जातीचा कवळ्या व विषारी मण्या₹ साप लोक व नवख्या सर्पमित्रांस ओळखू येत नाही अशावेळी बिनविषारी सापांचा सुद्धा नाहक जीव जातो. खरेतर साप हा सजीवस्रुष्टीचा एक महत्त्वाचा व अद्भूत घटक आहे. पर्यावरण समतोलासाठी तो वाचावयास हवा.

न्यूज अनकट प्रतिनिधी:सर्पमिञ जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा