वन्य प्राणी जीव विशेष भाग ५ सर्प

मराठी_नाव -: नानेटी
विदर्भ :- वासुकी,वास्या
इंग्लिश_नाव -: Buff striped keelback Snake
शास्त्रीय_नाव -: Amphiesma stolatum

सरासरी_लांबी -: ४०-४५ सें.मी. ( १ फुट ६ इंच )
अधिकतम_लांबी -: ८० सें.मी. (२ फुट ७इंच )

रंगवआकार -: तपकिरी, फिकट तपकिरी किंवा पिवळ्या रेषा डोक्यापासून शेपटीपर्यंत शरीराच्या दोन्ही बाजूस आसतात.पोट पिवळे असून पोटाकडील खवले सुद्धा पिवळे असतात.डोळ्यामागे डोक्याच्या दोन्ही बाजूस दोन काळ्या रेषा असतात.शरीर सडपातळ असून ,शेपटी ही निमुळती व टोकदार आसते.

प्रजनन -: मीलनाच्या काळात एका मादीच्या मागे साधारण ७-१२ नर (अनुभवातून) फिरताना आढळतात.मादी वर्षीच्या कुठल्याही काळात साधारण ५-२५ अंडी घालते .

खाद्य -: मुख्यतः बेडूक,उंदीर,सरडे पाली आणि लहान असताना बेडूक मासे

आढळ -: अंदमान व निकोबार बेट वगळता भारतात सर्वत्र.

वास्तव्य -: पाणथळ जागा, गवताळ प्रदेश व भातशेती तसेच मानवी वस्ती.

वैशिष्ट्ये -: दिनचर , सहसा चावत नाही. पण डिवचला असता मानेजवळचा भाग फुगवून खवल्यांमधला निळा व लाल रंग प्रदर्शित करतो.

संदर्भपुस्तक -: साप, (निलीमकुमार खैरे)

अंधश्रद्धा

१. वासुकी साप विषारी असतो?

उत्तर :- विषारी सापास विष दंत असतात,व मुळात हा साप बिनविषारी आहे.

२. या सापाने आपले विष पळसाच्या पानावर काढून अंघोळीला गेल्याचा व नंतर परत विष तोंडात घातल्याचा समज आहे ?

उत्तर:- ही एक दंतकथा आहे. वासुकीच नाही तर कोणताही साप आपले विष काढून परत ते तोंडात घालू शकत नाही,कारण विष सापाच्या तोंडात नाही तर विष दंतात (विषाच्या दातामधे) असते. कथेमध्ये सांगण्यात येणारे विष म्हणजे सापाची जीभ आहे.

३) धामण व वासुकी सर्व सापांची जननी आहे..?

उत्तर:- भारतात वाळा साप वगळता, सर्व सापांच्या जातीमधे नर-व मादा असे दोन स्वतंत्र लिंगाचे साप असतात व मादा साप स्वजातीच्या सापालाच जन्म देते.

४) या सापाला मारलं की ७-८ साप बदला घ्यायला मागे लागतात..?

उत्तर:- वर प्रजनन या मुद्द्यामध्ये सांगीतल्याप्रमाणे मीलनाच्या वेळी एका मादी वासुकी सापामागे ७-१२ नर वासूकी साप मीलनासाठी धावत आसतात. अशावेळी सुरुवातीला मादा साप समोर असते व ती आपल्या प्रजनन केंद्रातून एक विशिष्ट्य प्रकारचा द्रव सोडत असते, त्या द्रवाच्या वासाने नर साप मादी सापाचा माग काढतात. अशावेळी जर मादी साप आपल्याकडंनं मारला गेला,तरी त्या द्रवाच्या वासाने बाकीचे नर साप तिथे येतात .व आपल्याला वाटते साप पाठलाग करत आहेत.
(मुळात हे प्रत्येक सापाच्या बाबतीत आहे,परंतू नानेटीच्या मागावर ७-१२ नर आसल्याने आपल्याला ७-१२ साप आपल्या मागाेवा असल्याचा भास होतो.)

न्यूज अनकट प्रतिनिधी: सर्पमित्र जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा