वन्य प्राणी जीव विशेष भाग ७ सर्प

मराठी नाव-: पट्टेरी मण्यार (विषारी)

इंग्लिश नाव -: Banded Krait

शास्त्रीय नाव -: Bungarus fasciatus

सरासरी लांबी-: १५० सें.मी. ( ४ फुट ११ इंच )

अधिकतम लांबी -: २२५ सें.मी. ( ८ फुट ५ इंच )

रंग व आकार -: शरीरावर रुंद काळे आणि पिवळे आडवे पट्टे . हे पट्टे पोटाकडे पुसट होत जातात. डोक्यावर इंग्रजी ‘व्ही’ ची (V) खून. खवले मऊ व चमकदार. त्रिकोणी शरीर, बोथट गोलाकार शेपटी.

प्रजनन-: एप्रिलच्या सुमारास मादी ४-१४ अंडी घालते. नवजात पिल्लांची लांबी साधारणपणे २५-४० सें.मी.

खाद्य-: इतर साप, क्वचित प्रसंगी उंदीर आणि पाली.

आढळ-: प. बंगाल, ओरिसा,आसाम, बिहार, अरुणाचल प्रदेश, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा,

वास्तव्य -: खेडी, खडकाळ प्रदेश तसेच दमट जंगलामध्ये आढळतो.

वैशिष्ट्ये-: अत्यंत लाजाळू असल्याने क्वचितच दिसतो. निशाचर; तरी पाणथळ जागी सकाळी उन्हे खाताना आढळतो.

सर्पदंश व लक्षणे-: ह्या सापांचे विषदंत लांबीला कमी असतात. नागाच्या विषापेक्षा खूप तीव्र किंवा जहाल असते. बरीचशी लक्षणे नागाच्या दंशाप्रमाणे असतात. फक्त दंश झालेल्या जागेवर जळजळ होत नाही किंवा सूज येत नाही व काही वेळाने पोटात आणि सांध्यांत अतिशय वेदना होऊ लागतात.

संदर्भ पुस्तक-: साप, निलीमकुमार खैरे

न्यूज अनकट

प्रतिनिधी:सर्पमित्र जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा