चारशे कोटींचे क्रिकेट स्टेडियम पांढरा हत्ती ठरणार का?

8

पिंपरी, ७ जुलै २०२३: शहराला लागून गहुंजे येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आहे. नेहरुनगर येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर सामने होत नसल्याने ते धूळ खात आहे. असे असताना पालिका मोशीत ४०० कोटींचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम बांधत आहे. त्यामुळे शहराच्या नावलौकिकात भर पडणार आहे. इतका मोठा खर्च करूनही नवे स्टेडियम पांढरा हत्ती ठरु नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मोशीहून लोहगावच्या दिशेने जाणाऱ्या ९० मीटर रस्तालगतच्या २१ एकर जागेत हे स्टेडियम बांधण्यात येत आहे. अर्थसंकल्पात त्याबाबत घोषणा केली आहे. खर्चास ४०० कोटींची प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. स्टेडियमचा प्राथमिक आराखडा तयारही झाला आहे. त्याबाबत आयुक्तांसमोर सादरीकरण करण्यात आले. लवकरच आराखडा अंतिम होईल. निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी एयुएम टेक्नॉलॉजीची नेमणूक करण्यात आली आहे.

शहरात कुस्ती, कबड्डी, अॅथलेटिक्स या खेळास प्राधान्य आहे. पालिकेच्या थेरगावमधील वेंगसरकर क्रिकेट अॅकॅडमीचा अपवाद वगळता, पुण्याच्या तुलनेत क्रिकेटचे प्रमाण शहरात कमी आहे. गहुंजे गाव पालिकेत समाविष्ट होणार असल्याने मोठा खर्च करून स्टेडियम बांधण्याची गरज नाही. आर्थिक उधळपट्टीसाठी हा खटाटोप केला जात असल्याचा आरोप होत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा