पुणे, २० जुलै २०२३ : जगातील सर्वात प्रसिद्ध मोबाईल ब्रँड टेक कंपनी असणारी Apple AI चॅटबॉटवर काम करत आहे. जो open Ai आणि गुगलच्या चॅटबॉटला आव्हान देऊ शकते, पण कंपनीने ग्राहकांसाठी ही टेक्नॉलॉजी जाहीर करण्याबाबत स्पष्टता दिलेली नाही आहे. २०२२ नोव्हेंबर महिन्यात open Ai कंपनीने आपला Chat Gpt चॅटबॉट लॉन्च केला आहे. या open ai ला स्पर्धा म्हणून गुगलने आपला Bard आणि मायक्रोसॉफ्टने देखील आपला चॅटबॉट लॉन्च केला आहे. सध्या जगभरामध्ये अनेक क्षेत्रात AI चा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. त्यामुळे अनेक कंपन्या आपला AI चॅटबॉट लॉन्च करत आहेत तर आधिक टेक कंपन्या AI वर काम करत आहेत.
Apple कंपनीने भाषेची शब्दरचना भंडार तयार करण्यासाठी आपले स्वतःचे फ्रेमवर्क तयार केले आहे. ChatGPT आणि google बार्ड सारख्या नवीन ऑफरच्या केंद्रस्थानी AI आधारित सिस्टीम आहे. Ajax या नावाने ओळखल्या जाणार्या त्या फाउंडेशनसह Apple ने चॅटबॉट सेवा देखील तयार केली आहे, ज्याला काही इंजिनिअर्स Apple GPT असे म्हणत आहेत. याबाबची माहिती न्यूयॉर्क मधील वृत्तपत्राने दिली आहे.
मिडियाने बुधवारी apple AI वर काम करत असल्याचा रिपोर्ट दिल्यानंतर Apple च्या शेअर्समध्ये २.३ टक्क्यांनी वाढ झाली आणि ही वाढ १९८.२३ डॉलर्सच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचली आहे. तर बातमीमुळे मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन, ओपने Ai चे भागीदार यांचे शेअर्स १ टक्क्यांनी घसरले. पण Apple ने यावर सद्या तरी प्रतिसाद दिलेला नाही.
apple AI मुळे Open Ai चे Chat Gpt, गुगल बार्ड आणि मायक्रोसॉफ्टच्या बिंज या कंपनीची चिंता वाढली आहे. अॅपलने अनेक वर्षांपासून आपल्या प्रॉडक्ट्समध्ये AI फीचर्स समाविष्ट केली आहेत. सध्या लॉन्च झालेले चॅटबॉट हे टेक्स्ट प्रॉम्प्टवर आधारित निबंध, फोटो आणि व्हिडीओ देखील तयार करू शकतात. अॅपल त्याचे मुख्य कृत्रिम बुद्धिमत्ता उत्पादन, सिरी व्हॉईस असिस्टंट, अलिकडच्या वर्षांत काही प्रमाणात स्थिर झाले आहे. मात्र कंपनीने iPhone वर फोटोंमध्ये सुधारणा आणि सर्च यासह इतर क्षेत्रांमध्ये प्रगती केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे