मुंबई, २० सप्टेंबर २०२२ : राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू असताना, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून काँग्रेसला घरचा आहेर देताना दिसत आहे. या मध्ये कपिल सिब्बल, आनंद शर्मा, गुलाब नबी आझाद या नेत्यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे आणि माझी मुख्यमंत्री सुशिल कुमार शिंदे यांनी नाराजी व्यक्त करत काँग्रेसला रामराम केलाय. तसेच जम्मू काश्मीर चे शेवटचे महाराजा हरी सिंह यांचे पुत्र करण सिंह हे नाराज असून भाजपच्या वाटेवर आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून काँगेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण नाराज असल्याच्या चर्चा आहेत.
अशोक चव्हाण यांच्या देवेंद्र फडणवीस तसेच भाजप नेत्यांशी भेटी झाल्या. त्यानंतर भाजप नेत्यांची सूचक विधानं येत होती. यामुळे अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांना जास्तच हवा मिळत होती, त्यामुळं अशोक चव्हाण भाजप मध्ये जाणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
या सगळ्या घडामोडीचा विचार करत काँग्रेसने आपला नवा डाव टाकला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चव्हाणांच्या नाराजी मुळे भाजप प्रवेश रोखण्यासाठी तसेच त्यांची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेसकडून त्यांना प्रदेशाध्यक्ष पद मिळण्याची शक्यता आहे. तसेच याबाबत विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: वैभव शिरकुंडे