डिसले गुरुजींचा राजीनामा नामंजूर करणार? शिक्षण आयुक्त स्तरावरुन हालचाली

मुंबई: २२ जुलै २०२२: आंतरराष्ट्रीय अवार्ड मिळालेल्या रणजितसिंह डिसले यांनी नुकतीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर शिक्षकाबाबत चुकीचं काम होऊ नये, अशा स्पष्ट शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले होते.

यानंतर शिक्षण विभाग खडबडून जागा झाला असून आता जागतिक पुरस्कार विजेत्या डिसले गुरुजींबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे‌. कारवाईला वैतागून राजीनामा परत घेण्याबाबत कारवाई सुरु झाल्याची माहिती आहे. मात्र डिसले गुरुजींनी राजीनामा परत घेण्याऐवजी आता जिल्हा प्रशासन हा राजीनामा नामंजूर करणार आहे.

यासंदर्भात शिक्षण आयुक्तांकडून जिल्हा मुख्याधिकाऱ्यांना लेखी सूचना आल्याचंही कळालं आहे. गेल्या आठवड्यातच डिसले गुरुजींनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर सर्व वस्तुस्थिती मांडली, त्यांच्यासमोर सर्व कागदपत्रं ठेवली. त्यावर त्यांनी संबंधित आधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.

या सर्व प्रकरणावर ८ ऑगस्टला भुमिका मांडणार आहे” जागतिक पुरस्कार विजेते सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्यासंदर्भातील पत्र शिक्षण विभागाकडे दिले आहे. त्यानंतर अतंराराष्ट्रीयय स्तरावर भारताचे नावलैकिक करणाऱ्या शिक्षकाला शासनाची नोकरी का सोडावी वाटली हा या निमित्ताने उपस्थित झालेल्या प्रश्न आहे. ग्लोबल पुरस्कार विजेते शिक्षक डिसले हे २०१७ ते २०२० या काळात गैरहजर असल्याचे प्रशासनाची माहिती खोटी निघाल्यानंतर त्याच्यांवर स्वतःचा पगार स्वतः काढल्याचा आरोपही खोटा असल्याचं समोर आलं होत.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा