इम्तियाज जलील भाजपात जाणार का ?

औरंगाबाद, ३ ऑक्टोंबर २०२२ : भाजपा नेते आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या एका विधानामुळे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. औरंगाबादमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी इम्तियाज जलील हे एमआयएमचे आहेत, पण भाजपाचे वाटतात असं विधान केलं आणि राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

औरंगाबादमध्ये आयोजित कार्यक्रमात रावसाहेब दानवे बोलत होते की मी इम्तियाज जलील यांच्या मताशी सहमत आहे. मराठवड्यात रेल्वेचं नेटवर्क नाही याचं मुख्य कारण म्हणजे आम्ही ब्रिटीश नाही, तर निजामच्या अधिपत्याखाली होतो. निजाम होता म्हणूनच आपण मागासलेलो आहोत. कारण त्याला रेल्वेची गरज नव्हती. पण आता मोदींचं सरकार असून, मराठवाड्यातील नेटवर्कमध्ये वाढ होईल असं मी आश्वासन देतो असं रावसाहेब दानवे म्हणाले आहेत. तसेच इम्तियाज एमआयएमचे आहेत, पण भाजपाचे वाटतात तसेच तुम्ही छत्रपती संभाजीनगरसाठी मागणी करायला हवी होती, पण औरंगाबादसाठी करत आहात असं विधान दांवेंनी केलं आहे

जेव्हा तुमच्याकडे देण्यासाठी आणि बोलण्यासाठी काही ठोस नसतं, तेव्हा निजामची आठवण होते. देण्यासाठी काहीच नसल्याने मी छत्रपती संभाजीनगरसाठी आणि तुम्ही औरंगाबादसाठी मागत आहात असं म्हणत आहेत. किमान तुम्ही संभाजीनगरसाठी काय घोषणा करणार आहात ते तरी सांगा अशी टीका जलील यांनी केली.

यानंतर जलील यांनी मी एमआयएमचा आहे आणि राहणार असून यांच्यावर नजर ठेवणार आहे’ असे बोलत ऑफरच्या चर्चेला पुर्णविराम दिला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा