भारतीय नौसेनेचे सामर्थ्य वाढवणार! स्वदेशी बनावटीची युद्धनौका ‘आयएनएस मोरमुगाओ’ आज होणार सामील

नवी दिल्ली, १८ डिसेंबर २०२२ : स्वावलंबी भारत मोहिमेअंतर्गत स्वदेशी बनावटीची विध्वंसक युद्धनौका ‘आयएनएस मोरमुगाओ’ आज भारतीय नौसेनेत सामील होणार आहे. रक्षा मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत मुंबईतील नौसेनेत डॉकयार्डमध्ये हा सोहळा पार पडेल.

यामुळे हिंदी महासागरात भारतीय नौदलाची पोहोच वाढेल आणि देशाच्या सागरी सीमांची सुरक्षा अधिक मजबूत होईल, असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले.

  • काय आहे खास ?

स्वावलंबी भारत मोहिमेअंतर्गत स्वदेशी युद्धनौका बांधण्यात आली असून या स्वदेशी युद्धनौकेची रचना भारतीय नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोने केली आहे.

INS मोरमुगाओ हे नाव पश्चिम किनारपट्टीवरील गोव्यातील ऐतिहासिक बंदर शहराच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. पोर्तुगीज राजवटीपासून गोव्याच्या मुक्तीला ६० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने INS मोरमुगाओने गेल्या वर्षी १९ डिसेंबर रोजी प्रथमच समुद्रात उतरवले.

भारतामध्ये बनवलेल्या बलाढ्य युद्धनौकांपैकी एक असलेल्या INS मोरमुगाओची लांबी १६३ मीटर आणि रुंदी १७ मीटर आहे. तर वजन ७,४०० टन इतके आहे. हे जहाज चार शक्तिशाली गॅस टर्बाइनने सुसज्ज आहे आणि ते ३० नॉट्सपेक्षा जास्त वेगाने पोहोचू शकते.

  • आण्विक, जैविक आणि रासायनिक युद्ध लढण्यास सक्षम

ही युद्धनौका आण्विक, जैविक आणि रासायनिक युद्ध लढण्यास सक्षम आहे. ‘विशाखापट्टणम क्लास डिस्ट्रॉयर्सपैकी दुसऱ्या नौदलात ती औपचारिकपणे सामील होणार आहे. युद्धनौका चार शक्तिशाली गॅस टर्बाइनद्वारे चालविली जाते.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा