भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार? १० सप्टेंबरला आशिया कपमध्ये होऊ शकतो सामना

पुणे, ५ सप्टेंबर २०२३ : आशिया कप २०२३ मध्ये आतापर्यंत ५ सामने खेळले गेले आहेत. हा सामना एकदिवसीय स्वरूपात खेळला जात आहे. या आशिया कपमध्ये सर्व संघांची २ गटात विभागणी करण्यात आली आहे. दरम्यान, २ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होता. ज्यामध्ये भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि ४८.५ षटकात एकूण २६६ धावा केल्या. तर पावसामुळे पाकिस्तानचा खेळ सुरू होऊ शकला नाही. आता भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमने-सामने येणार असल्याच्या बातम्या येत आहेत. दोन्ही देशांमधील ८ दिवसांतील ही दुसरी चकमक असेल.

सततच्या पावसामुळे भारत-पाक सामन्याचे ठिकाण बदलण्यात आले असून आता कोलंबोऐवजी हंबनटोटा हे नवीन ठिकाण निवडण्यात आले आहे. श्रीलंकेच्या दक्षिणेस वसलेले हे शहर कोरडे क्षेत्र मानले जाते. आता पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यात मोठी लढत रंगण्याची शक्यता आहे. १० सप्टेंबर रविवार असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

या स्पर्धेत भारताचे आत्तापर्यंत एकूण ३ गुण झाले असून पाकिस्तानचेही ३ गुण आहेत. दोन्ही संघांनी सुपर-४ मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. या सुपर-४ संघांची लढत, १७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या आशिया चषक २०२३ फायनल मध्ये कोणता संघ खेळू शकेल हे ठरवेल. आतापर्यंत भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश या तीन संघांनी सुपर- ४ मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. ६ सप्टेंबरपासून सुपर-४ सामने सुरू होणार आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा