जितेंद्र आव्हाड आमदारकीचा राजीनामा देणार ?

मुंबई, १४ नोव्हेंबर २०२२ : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याविरोधात ७२ तासांच्या आत पोलिसांनी दोन खोटे गुन्हे दाखल केले असल्याचा आरोप ट्वीटच्या माध्यमातून केलाय. ही लोकशाहीची हत्या असल्याचंही त्यांनी ट्विटर मार्फत सांगितलंय. तसंच आव्हाड आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे, असं ट्वीट केलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांना विवियाना मॉलमधील हर हर महादेवस सिनेमाचा आक्षेप घेत सिनेमा हॉल मध्ये मारहाण प्रकरणात वर्तक नगर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली होती. त्यानंतर शनिवारी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर केलाय. या सोबतच कळवा येथे एका पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमात आव्हाड यांनी धक्का दिल्याचा आरोप एका महिलेनं केला आणि आव्हाड यांच्याविरोधात आता विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मागील साधारण ३ दिवसांमध्ये आव्हाड यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याच कारणामुळे ७२ तासांत माझ्यावर दोन खोटे गुन्हे दाखल केले, म्हणत त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे, असं ट्वीटद्वारे ट्विट करत जाहीर केलंय.

मी या पोलिसी अत्याचाराविरोधात लढणार आहे. मी लोकशाहीची हत्या झालेली पाहू शकत नाही, असंही जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट मध्ये सांगितलं आहे.

तसेच या प्रकारानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या प्रकरणात आता महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतलाय. राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण, शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांच्यासह काही खासदार आणि महिला लोकप्रतिनिधी राज्यपालांची भेट घेणार असून जितेंद्र आव्हाड यांचं प्रकरण सांगणार आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा