नवी दिल्ली, 17 ऑक्टोंबर 2021: सूत्रांच्या माहितीनुसार, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांचं नाव पुढं केलं होतं. यावर इतर सर्व सदस्यांनीही एकमतानं सहमती दर्शवली. सीडब्ल्यूसीच्या बैठकीत राहुल गांधी यांना काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करण्यास सांगितलं असता त्यांनी त्यावर विचार करू असं उत्तर दिलं.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी बैठकीत असंही सांगितलं की, त्यांना पक्षाच्या नेत्यांकडून विचारधारेवर स्पष्टता हवी आहे. काही नेत्यांनी सांगितलं की त्यांना निवडणुकीपर्यंत कार्यकारी अध्यक्ष बनवावं. त्याचवेळी, बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या अंबिका सोनी यांनी हेही सांगितलं की, सर्वांनी एकमतानं सहमती दर्शवली की ते (राहुल गांधी) (पक्षाध्यक्ष) होतील की नाही, हे त्यांच्यावर अवलंबून आहे. प्रत्येकाचं मत आहे की राहुल गांधींनी पक्षाध्यक्ष व्हावं.
अंबिका सोनी म्हणाल्या, “तिथं (CWC) G-23 चा उल्लेखही नव्हता. ते बैठकीला उपस्थित होते. काँग्रेस गटांमध्ये विभागली गेली नाही, आम्ही एक आहोत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सर्व नेत्यांना एकमतानं राहुल गांधींनी पक्षाध्यक्ष व्हावं असं वाटतं. प्रक्रिया (निवडणुकीसाठी) सप्टेंबर (2022) मध्ये सुरू होईल. “
उल्लेखनीय आहे की 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. ती निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढली गेली, ज्यात पक्षाच्या अपेक्षे प्रमाणे निकाल लागला नाही. राहुल गांधी डिसेंबर 2017 ते 2019 पर्यंत पक्षाचे अध्यक्ष होते. त्यांच्या आधी ही जबाबदारी सोनिया गांधींनी घेतली आणि नंतर राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर सोनिया गांधी यांची पक्षाच्या अंतरिम अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे