आमदारांच्या यादीतून राजू शेट्टी यांचं नाव वगळणार का, नवाब मलिक यांनी दिले स्पष्टीकरण

मुंबई, ३ सप्टेंबर २०२१: नुकतीच मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांनी राज्यपाल यांची १२ आमदारांच्या नियुक्ती या मुद्द्यावरून बैठक घेतली होती. राजू शेट्टी यांचे नाव यादीतून वगळले जाणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, या चर्चेत कोणतेही तथ्य नाही असे स्पष्टीकरण नवाब मलिक यांनी दिले आहे. १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्यपाल लवकरच निर्णय घेतील अशी माहिती अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. तसेच काही सूचना असल्यास त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अधिकार आहेत असे देखील नवाब मलिक यांनी म्हटलं.
पत्रकारांशी बोलताना मलिक म्हणाले की, “मधल्या काळात हायकोर्ट मध्ये निकाल गेला, हायकोर्टाने त्यावर भाष्य केलं. आता अपेक्षित आहे की लवकरच राज्यपाल हा निर्णय हाती घेतील. कालच्या चर्चेत तिन्ही पक्षांचे नेते तसेच मुख्यमंत्री राज्यपालांना भेटले. यादरम्यान सकारात्मक चर्चा झाली. याबाबत लवकरच राज्यपाल निर्णय देखील घेता येईल.”
राजू शेट्टींबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, “या चर्चेमध्ये कोणतेही तथ्य नाही. राज्यपाल सोबत चर्चा झाली आहे आणि लवकरच याबाबत निर्णय घेणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे. याबाबत त्यांच्या आणखीन काही सूचना असतील तर मुख्यमंत्र्यांना सर्व अधिकार देण्यात आले आहेत. राज्यपालांना यावर काही आक्षेप असेल तर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल.”
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा